लोकगीतांनी केले रसिकांचे रंजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2020 10:53 PM2020-01-30T22:53:07+5:302020-01-31T00:53:59+5:30
महाराष्टÑातील लोकगीते व त्यावर सादर करण्यात आलेले नृत्य यामुळे रसिकांचे चांगलेच रंजन झाले. लोकनेते दत्ताजी पाटील यांच्या स्मृती सोहळ्यानिमित्त लासलगावी बी. आर. चव्हाण निर्मित मराठमोळ्या सांस्कृतिक कार्यक्रमात लोकसंगीताचा बहारदार कार्यक्रम महाराष्ट्राची लोकधाराचे आयोजन करण्यात आले होते.
लासलगाव : महाराष्टÑातील लोकगीते व त्यावर सादर करण्यात आलेले नृत्य यामुळे रसिकांचे चांगलेच रंजन झाले.
लोकनेते दत्ताजी पाटील यांच्या स्मृती सोहळ्यानिमित्त लासलगावी बी. आर. चव्हाण निर्मित मराठमोळ्या सांस्कृतिक कार्यक्रमात लोकसंगीताचा बहारदार कार्यक्रम महाराष्ट्राची लोकधाराचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमात कलावंतांनी संस्कृतीला उजाळा मिळावा म्हणून गणेश वंदना, गवळण, भूपाळी, ओवी, धनगरी गीत, कोळीगीते, लोकगीत, गोंधळ, भारुड, पोवाडा, मुरळी, वारकरी, मंगळागौर, पोतराज, पिंगळा, लावणी, जागर, भैरवी असे लोकसंगीतातील अस्सल सुश्राव्य गीत प्रकार सादर करून उपस्थितांची मने जिंकली. प्रमुख अतिथींमध्ये लासलगाव बाजार समितीच्या सभापती सुवर्णा जगताप, सविता दायमा, सीमा कुलकर्णी, मनीषा ठाकरे, शगुफ्ता पठाण, पुष्पा दरेकर आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. संस्थेच्या संचालिका निता पाटील व पं.स. सदस्य रंजना पाटील यांनी यासाठी पुढाकार घेतला. कार्यक्र्रमाचे उद्घाटन ललिता चव्हाणके यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षीय मनोगतात अनिता अहिरे यांनी सांस्कृतिक परंपरांचे महत्त्व सांगून संस्कृतीचे जतन करावे, असे सांगितले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी अर्चना पानगव्हाणे, श्रीहरी शिंदे, प्रतिभा डोंगरे, रेश्मा वैष्णव यांनी विशेष कष्ट घेतले. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष नानासाहेब पाटील, सचिव संजय पाटील, शंतनू पाटील, सीताराम जगताप, प्रकाश जोशी, विजय चव्हाण, बाबासाहेब गोसावी, सुधा आहेर, अनिस काझी, संजीवनी पाटील, रोशनी गायकवाड आदी उपस्थित होते.