खासदारांच्या निवासस्थानी लोकगीतांचा जागर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2018 04:58 PM2018-11-22T16:58:42+5:302018-11-22T17:01:02+5:30

पेठ : महाराष्ट्रातील दर्याखोर्यात वाडी वस्तीवर आदिवासी लोकसंस्कृतीचे जतन करण्यासाठी अनेक लोककलावंत पिढयानंंपिढया आदिवासी लोकगीते व लोकनृत्याच्या माध्यमातून संस्कृती जतनाचे कार्य करत असून आयुष्याच्या वयात अशा कलाकारांना शासनाने मानधन सुरू करावे या मागणीसाठी पेठ तालुक्यातील निरगुडे येथील वृध्द कलााकारांनी अनोखे गार्हाणे मांडत थेट खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांचे निवासस्थान गाठत लोकगीतांचा जागर घातला.

Folk songs of MPs stay at home | खासदारांच्या निवासस्थानी लोकगीतांचा जागर

निरगुडे( ता. पेठ) येथील आदिवासी लोककलावंतांनी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांचे समोर अशी कला सादर केली.

googlenewsNext
ठळक मुद्देमानधनासाठी साकडे : आदिवासी लोक कलाकारांचे अनोखे गाºहाणे

पेठ :  महाराष्ट्रातील दर्याखोर्यात वाडी वस्तीवर आदिवासी लोकसंस्कृतीचे जतन करण्यासाठी अनेक लोककलावंत पिढयानंंपिढया आदिवासी लोकगीते व लोकनृत्याच्या माध्यमातून संस्कृती जतनाचे कार्य करत असून आयुष्याच्या वयात अशा कलाकारांना शासनाने मानधन सुरू करावे या मागणीसाठी पेठ तालुक्यातील निरगुडे येथील वृध्द कलााकारांनी अनोखे गार्हाणे मांडत थेट खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांचे निवासस्थान गाठत लोकगीतांचा जागर घातला.
पेठ तालुक्यातील बहुतांश गावात पारंपारिक आदिवासी वाद्य, गीते व नृत्य करणारे कलापथक आहेत. पातळी, धाब्याचापाडा येथील आदिवासी कलापथकांनी दिल्लीपर्यंत मजल मारली. मात्र एकीकडे आदिवासी संस्कृतीचे जतन करत असतांना यासाठी लागणारे साहित्य खरेदी, प्रवासासाठी लागणारा खर्च व जाणारा वेळ यामुळे लोककलावंताच्या कुटुंबात आर्थिक कुंचबना होतांना दिसून येत आहे. शिवाय वयाच्या साठीनंतर अशा कलावंतांना परावलंबी जीवन जगावे लागत असल्याने किमान पोटाची खळगी भरण्याइतपत शासनाने मानधन द्यावे अशी मागणी करण्यात येत आहे. बहुतांश कलावंत हे गावोगाव विखुरलेले असल्याने त्यांचे संघटन होऊ शकत नाही. शासन दरबारी दुर्लक्षति राहिलेल्या या कलावंतानी आपल्या ढोलकी तुणतुण्यासह थेट खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांचे नाशिकिस्थत निवासस्थान गाठले. आपली मागणी शासन दरबारी पोहचवण्याची विनंती करतांना चव्हाण यांच्या इच्छेरून पारंपारिक लोकगीतांचा जागर घालण्यात आला. आतातरी शासन या कलावंताना मानधन सुरू करेल का ? असा सवाल उपस्थित कलाकारांच्या मनात आहे.आदिवासी लोककलावंताना मानधन सुरू करण्यासाठी समाजकल्याण विभागाकडे पाठपुरावा करण्यात येईल असे आश्वासन चव्हाण यांनी दिले.
पेठ -सुरगाणा तालुक्यात विविध धार्मिक व पारंपारिक उत्सवाच्या निमित्ताने अशिक्षति लोककलावंत गावोगाव फिरून लोककला सादर करत असतांना उतारवयात अशा कलावंतांना आर्थिक कुंचबना सहन करावी लागते. तरी शासनाने अशा दुर्लक्षति लोककलावंतांचे स्वतंत्र यंत्रणेकडून सर्वेक्षण करु न त्यांना मानधन सुरू करावे ही आमची प्रमुख मागणी आहे.
- काशिनाथ खराटे, लोककलावंत, निरगुडे ता. पेठ

 पेठ तालुक्याचा दौरा करत असतांना अनेक गावांमध्ये आदिवासी संस्कृती टिकवून ठेवण्यायासाठी प्रयत्न करणारे कलावंत भेटत असतात. अशा कलावंतांना शासनाकडून योग्य मानधन मिळवून देण्यासाठी संबंधित शासकिय यंत्रणेकडे पाठपुरावा सुरू केला असून शासनाच्या सांस्कृतिक विभागाने अशा प्रकारच्या तळागाळात वास्तव्यास असलेल्या लोक कलाकारांची सुची तयार करावी अशी मागणी करण्यात आली आहे.
- हरिशंद्र चव्हाण,खासदार
दिंडोरी लोकसभा
 

Web Title: Folk songs of MPs stay at home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक