त्रिसूत्रीचे पालन करून धम्म आचरण करावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2017 12:33 AM2017-09-22T00:33:04+5:302017-09-22T00:33:32+5:30
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित असलेल्या बौद्ध धर्मानुसार प्रत्येकाने आपल्या कथनी आणि करणीतून प्रज्ञा, शील, चारित्र्य या त्रिसूत्रींमधून आपण बौद्ध असल्याचे दाखवून द्यावे. तेव्हाच खºया अर्थाने बौद्ध धम्म संपन्न होईल, असे प्रतिपादन चैत्यभूमी येथील भन्ते करुणानंद यांनी केले.
नाशिक : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित असलेल्या बौद्ध धर्मानुसार प्रत्येकाने आपल्या कथनी आणि करणीतून प्रज्ञा, शील, चारित्र्य या त्रिसूत्रींमधून आपण बौद्ध असल्याचे दाखवून द्यावे. तेव्हाच खºया अर्थाने बौद्ध धम्म संपन्न होईल, असे प्रतिपादन चैत्यभूमी येथील भन्ते करुणानंद यांनी केले.
गोल्फ क्लब येथे दहा दिवसांच्या अखिल भारतीय समता सैनिक दल, भारतीय बौद्ध महासभा, बीएमए ग्रुप यांच्या वतीने महाबौद्ध धम्म मेळावा व महाश्रामणेर शिबिराच्या उद््घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर भदन्त ज्ञानज्योती, भदन्त प्रज्ञा बोधी, माजी नगरसेवक उषा अहिरे, वसंतराव नाईक महामंडळाचे संचालक रमेश बनसोड, राहुल बच्छाव, विजयकुमार खंडागळे, योगेश जाधव, मोहन अढांगळे, रमेश जगताप, भाउराव वानखेडे, चंद्रकांत गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते. भन्ते करुणानंद म्हणाले की, आज समाजाची अवस्था अतिशय बिकट आहे. आज आपण दुसºया समाजाला नावे ठेवतो, परंतु कुंपणच शेत खात असताना शेजाºयाशी भांडून काय फायदा, असे परखड विचार त्यांनी मांडले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी त्रिसूत्री कार्यक्र म जाहीर केला होता. परंतु तो कार्यक्र मदेखील आज यशस्वी होऊ शकलेला नाही, ही शोकांतिका आहे. वर्तमान स्थितीत समाजाचे अवलोकन केले तर समाजाची धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक स्थिती निराशाजनक आहे. असेही ते म्हणाले. भदन्त ज्ञानज्योती यांनी सांगितले, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेल्या बौद्ध धम्माची आज निर्मिती होण्याची गरज आहे. प्रास्ताविक रमेश बनसोड यांनी केले. बनसोड म्हणाले की, प्रत्येक घरातून एक श्रामणेर निर्माण करण्याची आज गरज आहे. आपल्या समाजाची ओळख निर्माण होईल असे कार्य करण्याची आवश्यकता आहे. मोहन अढांगळे यांनी कार्यक्र माची भूमिका स्पष्ट केली. सूत्रसंचालन चंद्रकांत गायकवाड यांनी केले.