आदर्श आचारसंहितेचे पालन करावे-जे. एस. सहारिया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2017 04:56 PM2017-11-30T16:56:15+5:302017-11-30T16:59:01+5:30
इगतपुरी- आदर्श आचारसंहीतेचे पालन करण्यासाठी निवडणूक प्रशासन, पोलीस प्रशासन, तहसील प्रशासन यांनी सुक्ष्म नियोजन केलेले आहे. राजकीय पक्षांचे उमेदवार व अपक्ष उमेदवारांनाही आदर्श आचारसंहीतेचे कडक पालन करावे लागेल. कुठल्याही परिस्थितीत कुठूनही आचारसंहिता भंग करणाºयांची गय केली जाणार नाही अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त जे. एस. सहारिया यांनी दिली.
इगतपुरी- आदर्श आचारसंहीतेचे पालन करण्यासाठी निवडणूक प्रशासन, पोलीस प्रशासन, तहसील प्रशासन यांनी सुक्ष्म नियोजन केलेले आहे. राजकीय पक्षांचे उमेदवार व अपक्ष उमेदवारांनाही आदर्श आचारसंहीतेचे कडक पालन करावे लागेल. कुठल्याही परिस्थितीत कुठूनही आचारसंहिता भंग करणाºयांची गय केली जाणार नाही अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त जे. एस. सहारिया यांनी दिली. इगतपुरी त्र्यंबकेश्वर निवडणुकीसाठी सहारिया यांनी इगतपुरीत आढावा बैठक घेतली. यावेळी त्यांनी तहसील, पोलिस, निवडणूक प्रशासनाच्या नियोजनाचे कौतुक केले.इगतपुरी त्र्यंबकेश्वर नगरपरिषद निवडणुकीत निवडणूक आयोगाच्या नियमाप्रमाणे अत्यावश्यक यंत्रणा कार्यरत आहे. निवडणुका नि:पक्षपाती वातावरणात पार पाडण्यासाठी निवडणूक आयोगाने सक्रि य लक्ष केंद्रित केले आहे. प्रत्येक राजकीय पक्षासह सर्व अपक्ष उमेदवारांना समान संधी, दारूचा महापूर रोखण्यासाठी नियोजन, गुन्हेगारांचा बंदोबस्त, आचारसंहिता भंगाबाबत कार्यवाही आदींवर कटाक्षाने वॉच ठेवण्यात येणार आहे.
राज्य निवडणूक आयुक्तांनी इगतपुरी त्र्यंबकेश्वर निवडणुकीसाठी दोन्ही तालुक्यातील निवडणूक यंत्रणेची आढावा बैठक घेऊन अधिकाºयांना विविध सूचना केल्या.