वक्त्याने भूमिकेला अनुसरून बोलावे
By Admin | Published: December 22, 2016 12:07 AM2016-12-22T00:07:18+5:302016-12-22T00:07:33+5:30
विनायकदादा पाटील : राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे उदघाटन
नाशिक : शब्द हे व्यक्त होण्याचे एक साधन आहे. ज्यांना शब्द आवडतात ते शब्दांच्या प्रेमात पडतात, वक्तृत्व हा शब्दवेड्यांचा मेळावा आहे, नाटकाप्रमाणे वक्तृत्वात भूमिका असते, त्या भूमिकेला अनुसरून बोलावे, असे प्रतिपादन वनाधिपती विनायकदादा पाटील यांनी केले. माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या संसदीय कारकिर्दीला ५० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई यांच्या विद्यमाने जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी केटीएचएम महाविद्यालयात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर चव्हाण प्रतिष्ठानचे विश्वास ठाकूर, राष्ट्रवादी कॉँग्रेसचे रवींद्र पगार, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, जि. प. सदस्य भारती पवार, मविप्रचेनाना महाले, सचिन पिंगळे, शिक्षणाधिकारी डॉ. डी. डी. काजळे, प्रा. एस. के. शिंदे, प्राचार्य डॉ. आर. डी. दरेकर आदि उपस्थित होते. सचिन पिंगळे यांनी प्रास्ताविक केले. स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून प्रा. पी. एस. वामने, प्रा. अशोक सोनवणे, डॉ. किरण रकिबे, डॉ. प्रकाश शेवाळे , प्रा. पुरु षोत्तम तायडे यांनी काम बघितले. डॉ. दिलीप पवार यांनी सूत्रसंचालन केले. याप्रसंगी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)