कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी नियमांचे पालन करा : पालकमंत्री भुजबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2021 04:14 AM2021-03-28T04:14:34+5:302021-03-28T04:14:34+5:30

येवला : कोरोनाचा संसर्ग शहरासोबतच ग्रामीण भागातही वाढत आहे. या अनुषंगाने शहरातील भाजीमंडईतील विक्रेते व नागरिकांशी संवाद साधत त्यांना ...

Follow the rules to break the chain of corona infection: Guardian Minister Bhujbal | कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी नियमांचे पालन करा : पालकमंत्री भुजबळ

कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी नियमांचे पालन करा : पालकमंत्री भुजबळ

Next

येवला : कोरोनाचा संसर्ग शहरासोबतच ग्रामीण भागातही वाढत आहे. या अनुषंगाने शहरातील भाजीमंडईतील विक्रेते व नागरिकांशी संवाद साधत त्यांना कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी कोरोना नियमांचे पालन करा, असे आवाहन पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे.

शहरातील भाजीमंडईसह गर्दीच्या ठिकाणांची पाहणी करून पालकमंत्री भुजबळ यांनी नागरिकांशी संवाद साधला. यावेळी प्रांताधिकारी सोपान कासार, तहसीलदार प्रमोद हिले, मुख्याधिकारी संगीता नांदूरकर, तालुका पोलीस निरीक्षक अनिल भवारी, शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप कोळी, येवला बाजार समितीचे प्रशासक वसंत पवार, येवला पंचायत समिती सदस्य मोहन शेलार यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

भुजबळ यांनी येवला शहरातील शनी पटांगण येथे भाजी बाजाराची पाहणी करून त्यानंतर शहरातील विविध गर्दीच्या ठिकाणी भेटी दिल्या. यादरम्यान त्यांनी फळ विक्रेते, हॉटेल यासह विविध दुकानांत प्रत्यक्ष भेट देऊन मास्क वापरण्याचे व कोरोना नियमावलीचे काटेकोर पालन करण्याचेदेखील आवाहन केले, तसेच मास्क आणि सुरक्षित अंतराचे पालन न करणाऱ्या दुकानदार, हॉटेल व्यावसायिक, विक्रेते, नागरिक यांच्यावर कारवाई करण्याच्या सूचना पोलीस व नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

पालकमंत्री छगन भुजबळ यांनी येवला उपजिल्हा रुग्णालयाला भेट दिली. यावेळी त्यांनी येथील कोविड लसीकरण केंद्राची व डेडिकेटेड कोविड केअर सेंटरची पाहणी करून रुग्णांशी संवाद साधला. यावेळी उपजिल्हा रुग्णालयाच्या अधीक्षक डॉ. शैलजा कुप्पास्वामी, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रशांत खैरे यांच्यासह आरोग्य अधिकारी उपस्थित होते.

(सोबत फोटो)

===Photopath===

270321\27nsk_39_27032021_13.jpg

===Caption===

भाजी मंडईसह गर्दीच्या ठिकाणांची पाहणी करतांना पालकमंत्री छगन भुजबळ

Web Title: Follow the rules to break the chain of corona infection: Guardian Minister Bhujbal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.