नियम पाळा... अन्यथा दंडात्मक कारवाई !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2021 09:02 PM2021-03-18T21:02:57+5:302021-03-19T01:22:35+5:30
विंचूर : नाशिक जिल्ह्यात निफाड तालुका कोरोनाचा ह्यहॉटस्पॉटह्ण ठरलेला असतानाही येथे आस्थापनांकडून शासनाने घालून दिलेले नियम पाळले जात नसल्याने ग्रामपालिका प्रशासनाने दंडात्मक कारवाईचा इशारा दिला आहे.
विंचूर : नाशिक जिल्ह्यात निफाड तालुका कोरोनाचा ह्यहॉटस्पॉटह्ण ठरलेला असतानाही येथे आस्थापनांकडून शासनाने घालून दिलेले नियम पाळले जात नसल्याने ग्रामपालिका प्रशासनाने दंडात्मक कारवाईचा इशारा दिला आहे.
जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र शिंदे यांच्यासह गटविकास अधिकारी संदीप कराड, लासलगावचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांनी विंचूर येथे भेट देऊन कोविड संदर्भात गावात पाहणी केली. गेल्यावर्षी जिल्ह्यातील कोरोनाचा पहिला रुग्ण निफाड तालुक्यातील विंचूर-लासलगावजवळ असलेल्या पिंपळगाव नजीक या गावात आढळला होता. मात्र, असे असतानाही ग्रामीण भागात काही नाही, असे म्हणून चालढकल करणाऱ्यांवर आता कारवाई करण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे.
गेल्या आठवड्यापासून सकाळी सात ते सायंकाळी सात वाजेपर्यंतच आस्थापने उघडण्यास शासनाने परवानगी दिली आहे. मात्र, असे असताना येथे सायंकाळी सातनंतर मोठ्या संख्येने दुकाने सुरू असतात. सायंकाळी गर्दी कमी होईल, अशी अपेक्षा असतानाही येथे सायंकाळी मोठ्या प्रमाणात ग्रामस्थांची वर्दळ असते.
-------------------------------
ग्रामपालिकेकडून जनजागृती
शासनाने घालून दिलेले नियम पाळले जात नसल्याने यापुढे नियम न पाळणार्या दुकानदारांवर दंडात्मक कारवाई होणार आहे. अजूनही बरेचसे ग्रामस्थ मास्क वापरताना दिसून येत नाहीत. अनेकजण घरातून निघताना मास्क घालून बाहेर निघतात आणि एकत्र आले की, मास्क काढून बोलत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे मास्क हनुवटीवर ठेवून सुशिक्षित म्हणवून घेणाऱ्यांनीही काळजी घेण्याची गरज आहे. ग्रामपालिकेच्यावतीने वेळोवेळी दवंडी देऊन जनजागृती केली जात असून, बुधवारी येथे चार कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत.
शासन नियमाप्रमाणे सायंकाळी सातनंतर दुकाने बंद केली पाहिजेत. मात्र, बहुतांशी व्यावसायिकांकडून त्याचे पालन होत नसल्याने अशा व्यावसायिकांवर दंडात्मक कारवाई केली जाईल. - जी. टी. खैरनार, ग्रामविकास अधिकारी, विंचूर
विंचूर येथे कोविड संदर्भात जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र शिंदे, गटविकास अधिकारी संदीप कराड, सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल वाघ आदींनी पाहणी केली.