VIDEO: ...अन् आसारामनंतर त्याच्या अनुयायांनाही रडू कोसळलं
By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2018 07:19 PM2018-04-25T19:19:36+5:302018-04-25T19:19:36+5:30
आसारामच्या अनुयायांचा नाशकात आक्रोश
Next
नाशिक: स्वयंघोषित अध्यात्मिक गुरू आसारामला अल्पवयीन मुलीवर लैंगिक बलात्कार केल्या प्रकरणी दोषी ठरवण्यात आल्यानंतर नाशिकमधील त्याच्या अनुयायांना रडू कोसळलं. अल्पवयीन मुलीवर बलात्कार प्रकरणाचा निकाल असल्यानं सकाळपासूनच आसारामच्या अनुयायांनी गंगापूर रोडजवळ असणाऱ्या आश्रमात गर्दी केली होती. आसाराम सहीसलामत सुटावा, यासाठी अनुयायांकडून देवाचा धावा सुरू होता. यज्ञही केले जात होते. मात्र न्यायालयानं आसारामला जन्मठेपेची शिक्षा सुनावताच त्याच्या अनुयायांना रडू कोसळलं. दुपारनंतर आश्रमात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनाही आश्रमात प्रवेश नाकारण्यात आला होता.