खरीपा पाठोपाठ आता रब्बीतही मका लागवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2020 10:05 PM2020-10-22T22:05:33+5:302020-10-23T00:02:36+5:30
जळगाव नेऊर : येवला तालुक्यात मोठ्या प्रमाणात खरीप मकाचे पीक घेतले जाते, तसेच मका बरोबर कांद्याचे क्षेत्र वाढण्याची शक्यता होती पण मोठ्या प्रमाणात कांदा रोपे बुरशीजन्य रोगाने जमिनीतच सडल्याने व आता टाकलेली लाल, उन्हाळ कांदा रोपे मुसळधार पावसाने झोडपले व पुढे रोपांची शाश्वती नसल्याने शेतकरी खरिपा पाठोपाठ रब्बीतही मका लागवड करत असून ,मका लागवडीचे क्षेत्र वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

कारण रब्बी हंगमात हरभरा , गहु, कांदा पिकाबरोबर आता मका पिकाच्या क्षेत्रातही वाढ झाल्याने शेतकऱ्यांना आता उन्हाळी मका पिकाचा पर्याय उपलब्ध झाला आहे,कारण पुर्वी शेतकरी खरीपातील मका पीक घेतल्यानंतर रब्बीतील उन्हाळी मका घेत नव्हते ,पण आता मागील वर्षांच्या अनुभवावरून रब्बीतही मका पीक चांगल्याप्रकारे येत असल्याने मका क्षेत्रात वाढ होण्याची शक्यता आहे .
यावर्षी खरिपातील मकाला लष्करी अळीचा प्रादुर्भाव कमी झाल्याने मका पिकाला औषधांचा खर्च कमी प्रमाणात येऊन मका पीक चांगले आले होते , या वर्षी बुरशीजन्य रोग व परतीच्या पावसाने मोठ्या प्रमाणात लाल,उन्हाळ कांदा रोपांची नुकसान झाल्याने व कांदा बियाण्या़चा तुटवडा असल्याने शेतकऱ्यांनी रब्बीतही उन्हाळी मका घेण्याचा पर्याय शोधल्याने शेतकऱ्यांना जनावरांना चारा उपलब्ध होऊन मकाचेही उत्पादन मिळणार आहे.
मुरघासाला मागणी
मागील वर्षी कांदा रोपे नसल्याने व गगनाला भिडलेल्या रोपांच्या भावामुळे शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात मका लागवड केली या मका लागवडीतून शेतकऱ्यांना मका पिकाच्या उत्पादनाबरोबर मुरघासासाठी मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांकडून मागणी राहिल्याने शेतकऱ्यांना चार पैसे अधिक मिळाले.
मी लाल व उन्हाळ कांद्यासाठी क्षेत्र ठेवले होते पण बुरशीजन्य रोगाने व परतीच्या पावसाने लाल, उन्हाळ कांद्याची रोपे खराब झाल्याने व बियानेचाही तुटवडा भासत असल्याने उन्हाळी मकाचा प्रयोग करून पाहिला.
- कोंडाजी शिंदे जळगाव नेऊर.ता . येवला