एकनिष्ठ युवा फाउंडेशनतर्फे पक्ष्यांसाठी अन्नपाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2021 04:10 AM2021-05-03T04:10:07+5:302021-05-03T04:10:07+5:30

या उपक्रमांतर्गत तेलाच्या, पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या, टीनचा उपयोग करून पक्ष्यांना पिण्यासाठी पाणी आणि अन्नाचे दाणे त्यामध्ये ठेवण्यात येतात. ...

Food and water for the birds by the Loyal Youth Foundation | एकनिष्ठ युवा फाउंडेशनतर्फे पक्ष्यांसाठी अन्नपाणी

एकनिष्ठ युवा फाउंडेशनतर्फे पक्ष्यांसाठी अन्नपाणी

Next

या उपक्रमांतर्गत तेलाच्या, पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या, टीनचा उपयोग करून पक्ष्यांना पिण्यासाठी पाणी आणि अन्नाचे दाणे त्यामध्ये ठेवण्यात येतात. ते शहरातील विविध ठिकाणी लावण्याचे एकनिष्ठ युवा फाउंडेशनने ठरवले आहे. एकनिष्ठ युवा फाउंडेशन यांनी गेल्यावर्षी समाजमाध्यमांवर तेलाच्या टीनच्या पिंपाचा अशा प्रकारे वापर करता येऊ शकतो, याबाबतचा फोटो बघितला आणि त्यातूनच त्यांनी ही अभिनव संकल्पना राबविण्याचा निर्धार केला आहे. शंभर पिंपे तसेच टाकाऊ बाटल्या तयार केल्या असून, त्यामध्ये पक्ष्यांसाठी पिण्याचे पाणी आणि अन्नधान्य ठेवण्यात येणार आहे. ही पिंपे झाडांवर लावण्यात येणार आहेत. जेणेकरून पक्ष्यांना पाणी आणि धान्य घेता येईल. या अभिनव उपक्रमांमध्ये जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी होऊन आपल्या परिसरात हा उपक्रम राबिण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन एकनिष्ठ युवा फाउंडेशनने केले आहे. या उपक्रमात एकनिष्ठ युवा फाउंडेशनचे गणेश शिरसाठ, हर्षल मराठे, चेतन गांगुर्डे, रोहित जगताप, यश खेरणार, अजय कोळी, अभिषेक पवार, प्रेम झरे, वैभव सोनवणे, यश चिखले, करण चिखले आदी सहभागी झाले आहेत.

(फोटो ०२ सिडको)

Web Title: Food and water for the birds by the Loyal Youth Foundation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.