ओझरच्या कालिका मित्रमंडळातर्फे अन्नदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2020 04:19 PM2020-04-01T16:19:18+5:302020-04-01T16:19:40+5:30

सध्या नाशिक जिल्हयात कोरोनाचा संशयित रु ग्ण सापडल्याने सर्वत्र नाकाबंदी केली आहे. त्यातच हिमाचल प्रदेशमधून कामधंद्यासाठी आलेले दोनशे ते अडीचशे नागरिक अडकून पडले आहेत. त्यामुळे प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत ओझर येथील श्री कालिका मित्र मंडळाच्या वतीने या नागरिकांच्या जेवणाची व्यवस्था करून दिली आहे.

Food donation by the Friends of Ozar's canal | ओझरच्या कालिका मित्रमंडळातर्फे अन्नदान

ओझर येथे नागरिकांना जेवण देताना भगवान मथुरे, सोमनाथ जाधव, प्रशांत अक्कर, मनोज तापकिरे आदी.

Next

ओझर : सध्या नाशिक जिल्हयात कोरोनाचा संशयित रु ग्ण सापडल्याने सर्वत्र नाकाबंदी केली आहे. त्यातच हिमाचल प्रदेशमधून कामधंद्यासाठी आलेले दोनशे ते अडीचशे नागरिक अडकून पडले आहेत. त्यामुळे प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत ओझर येथील श्री कालिका मित्र मंडळाच्या वतीने या नागरिकांच्या जेवणाची व्यवस्था करून दिली आहे.
मंडळाचे सोमनाथ जाधव व प्रशांत अक्कर यांनी सर्व धान्य व पीठ, मिठ, मिरचीपासून तांदळापर्यंत वस्तू उपलब्ध करून दिल्या. ओझर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्यासह पोलीस कर्मचार्यांनाही मदतीला घेऊन जानोरी रोड (दहावा मैल ) येथे सुरक्षित व शासनाच्या नियमांचे पालन करून या नागरिकांची भूक भागवली. मनोज तापकिरे, विशाल भट्टड, अमित कोळपकर, राकेश कोळपकर, गोपाल कायस्थ, हर्षल शिरापुरे, सुनील गोरे, दिलीप बंदरे, शब्बीर खाटीक, गणेश अक्कर, सचिन कायस्थ, अनिल कायस्थ, संतोष कायस्थ, श्रीकांत अक्कर, प्रशांत तापकिरे व ओझरचे पोलीस कर्मचारी उपस्थित होते.

Web Title: Food donation by the Friends of Ozar's canal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.