१०१ कष्टकरी कुटुंबांना शाळकरी मित्रांकडून अन्नधान्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2020 11:14 PM2020-04-19T23:14:57+5:302020-04-19T23:15:11+5:30

येवला शहरातील जनता विद्यालयातील सन २००१-०२ या शैक्षणिक वर्षातील दहावीच्या वर्गमित्रांनी एकत्र येत सामाजिक जाणिवेतून तालुक्यातील मजूर, कष्टकरी कुटुंबांंना अन्नधान्य वाटप केले.

Food for hard working families from school friends | १०१ कष्टकरी कुटुंबांना शाळकरी मित्रांकडून अन्नधान्य

१०१ कष्टकरी कुटुंबांना शाळकरी मित्रांकडून अन्नधान्य

Next



येवला : शहरातील जनता विद्यालयातील सन २००१-०२ या शैक्षणिक वर्षातील दहावीच्या वर्गमित्रांनी एकत्र येत सामाजिक जाणिवेतून तालुक्यातील मजूर, कष्टकरी कुटुंबांंना अन्नधान्य वाटप केले.
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शासनाने संचारबंदी लागू केल्याने रोजंदारी मजूर व कामगार कुटुंबीयांपुढे उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. जनता विद्यालयातील सन २००१-०२ या शैक्षणिक वर्षातील इयत्ता दहावीचे वर्गमित्र ‘शाळा एक बालपण’ या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपच्या माध्यमातून चर्चा झाली. ग्रुपमधील सर्व सदस्य मित्रांनी वर्गणी वाढण्याचे ठरवले, जमा झालेल्या वर्गणीतून किराणा माल खरेदी केला.
५ किलो गहू, ५ किलो तांदूळ, १ किलो खाद्यतेल, 1 किलो साखर, चहापुडा आदी वस्तूंचा समावेश असलेली १०१ पाकिटे तयार केली व तालुक्यातील बाभूळगाव, नगरसूल तसेच येवला परिसरातील गरजूंपर्यंत सदर पाकिटे वाटप केली. या उपक्रमात वर्गमित्र योगेश सोनवणे, चेतन लोणारी, पवन पाटील, ललित पंचारिया, सागर देवरे, दीपक सोनवणे, गौरी वर्मा, अनामिका पेठकर, मोनाली टाक, संपदा भावसार आदींनी सहभाग घेतला.

Web Title: Food for hard working families from school friends

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.