येवल्यात सामाजिक संस्थांकडून गरजूंना अन्नाची पाकिटे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2020 04:57 PM2020-03-30T16:57:43+5:302020-03-30T16:58:18+5:30
कोरोनामुळे रोजगार गमावलेल्या कष्टकरी, मजूर, बेघर नागरिकांची उपासमार होऊ नये म्हणून या घटकांसाठी सामाजिक संस्थांच्या माध्यमातून अन्नाची पाकिटे व पाणी उपलब्ध करून दिले आहे.
येवला : कोरोनामुळे रोजगार गमावलेल्या कष्टकरी, मजूर, बेघर नागरिकांची उपासमार होऊ नये म्हणून या घटकांसाठी सामाजिक संस्थांच्या माध्यमातून अन्नाची पाकिटे व पाणी उपलब्ध करून दिले आहे.
तहसिलदार रोहिदास वारूळे यांनी शहरातील सामाजिक कार्यकर्त्यांची बैठक घेऊन सामाजिक संस्थाना अन्नदान सहभागाबाबत आवाहन केले. या आवाहनाला प्रतिसाद देत यातून येवला कांदा व्यापारी असोसिएशन, माणूसकी फॉऊंडेशन व येवला सोशल मिडीया फोरम या तीन संस्थांनी एकत्र येत स्वत: अन्न शिजवून ते पाकीटातून वितरण करण्याची जबाबदारी स्विकारली. यात कांदा व्यापारी असोसिएशनने शिधा बनविण्याचा संपूर्ण खर्च उचलला असून त्यांचेकडील तयार अन्नाची पाकिटे माणूसकी फाऊंडेशन व येवला सोशल मिडीया फोरमचे कार्यकर्ते गरजूंपर्यंत पोहचवित आहेत. सुमारे दोन महिने हा उपक्र म सातत्याने चालवण्याचे नियोजन करण्यात आले आहे. अन्न पाकीटे वितरीत करताना राहुल लोणारी, किरणसिंग परदेशी, योगेश सोनवणे, सुभाष गांगुर्डे, तरंग गुजराथी, भूषण शिनकर, अक्षय तांदळे आदी कार्यकर्ते मास्क, हॅन्डग्लोज घालून आपली सुरक्षा व योग्य अंतर राखून कर्तव्य पार पाडीत आहेत. माणूसकी फाऊंडेशनचे अल्केश कासलीवाल, येवला सोशल मिडिया फोरमचे समन्वयक अविनाश शिंदे या उपक्र माचे नियोजन करीत असून नागरिकांकडून या संस्था व पदाधिकाऱ्यांना धन्यवाद दिले जात आहेत.