जेवणाचा दर्जा योग्य आहे काय?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2018 04:24 PM2018-04-28T16:24:51+5:302018-04-28T16:24:51+5:30
राज्याचे समाज कल्याण आयुक्त मिलिंद शंभरकर यांनी शनिवारी सकाळी समाज कल्याण विभागाच्या नाशिक - पुणे रस्त्यावरील मुलींच्या शासकीय वसतिगृहास अचानक भेट दिली. अधिकाऱ्यांशी चर्चा करण्याऐवजी शंभरकर यांनी थेट मुलींच्या वस्तीगृहाला भेट दिली. त्यावेळी त्यांनी विद्यार्थिनींशी व्यक्तीगत पातळीवर संवाद साधतांना
नाशिक : ‘आपल्या पैकी कोण सीईटी परीक्षेची तयारी करत आहे? क्लास लावला आहे का ? अभ्यासिका चांगली आहे का ? इंटरनेट सुविधा आहे का ? जेवण चांगले आहे का ? स्वच्छता चांगली आहे का ? परिसर कसा आहे? असल्या प्रकारचे एकामागोमाग असंख्य प्रश्नांची सरबत्ती करून आस्थेवाईकपणे मुलींशी शनिवारी सकाळी राज्याचे समाजकल्याण आयुक्त मिलींद श ंभरकर यांनी थेट संवाद साधला. यावेळी विद्यार्थिनींनीही पटापट उत्तरे देत त्यांचे समाधान केले.
राज्याचे समाज कल्याण आयुक्त मिलिंद शंभरकर यांनी शनिवारी सकाळी समाज कल्याण विभागाच्या नाशिक - पुणे रस्त्यावरील मुलींच्या शासकीय वसतिगृहास अचानक भेट दिली. अधिकाऱ्यांशी चर्चा करण्याऐवजी शंभरकर यांनी थेट मुलींच्या वस्तीगृहाला भेट दिली. त्यावेळी त्यांनी विद्यार्थिनींशी व्यक्तीगत पातळीवर संवाद साधतांना त्यांना मिळणा-या सुख, सोयींबरोबरच शैक्षणिक प्रगतीबाबत तसेच भवितव्याबाबत चर्चा केली. यावेळी प्रादेशिक उपआयुक्त राजेंद्र कलाल, विशेष अधिकारी देविदास नांदगावकर, गृहप्रमुख सरिता रेड्डी, सविता गवारे, नंदा रायते व सुभाष फड आदी उपस्थित होते.
यावेळी शंभरकर यांनी मुलींना आपली नियमित आरोग्य तपासणी होते? हिमोग्लोबीन तपासणी केव्हा झाली? वसतिगृहाच्या वेळापत्रकात आरोग्य तपासणी समाविष्ट असते? असे प्रश्न विचारून त्यांनी मुलींच्या आरोग्याच्या समस्या जाणून घेतल्या. वसतिगृहातील आहार पुरेशा आहे का? आपणास नासत्यात दूध, अंडी, फळे नियमीत भेटतात का ? संगणकरूम मध्ये इंटरनेट सुविधा आहे का? अभ्यासिकेत पुस्तके आहेत का ? आपण स्पर्धा परीक्षा पुस्तके वापरता का ? असा प्रकारे संवाद साधत आयुक्तांनी उपस्थित विद्यार्थिनींना परीक्षांचा शुभेच्छा दिल्या.
यावेळी आयुक्त मिलिंद शंभरकर यांनी शासकीय वसतिगृहाचा फेरफटका मारला. मुलींच्या निवास रूम मधील सुविधांची पाहणी करून वसतिगृहाच्या स्वच्छता बाबत उपस्थित गृह प्रमुखांना सुचना दिल्या.