जेवणाचा दर्जा योग्य आहे काय? समाजकल्याण आयुक्तांचा थेट मुलींशी संवाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2018 12:12 AM2018-04-29T00:12:06+5:302018-04-29T00:12:06+5:30
आपल्यापैकी कोण सीईटी परीक्षेची तयारी करत आहे? क्लास लावला आहे का? अभ्यासिका चांगली आहे का? इंटरनेट सुविधा आहे का? जेवण चांगले आहे का? स्वच्छता चांगली आहे का? परिसर कसा आहे? असल्या प्रकारच्या एकामागोमाग एक असंख्य प्रश्नांची सरबत्ती करून आस्थेवाईकपणे मुलींशी शनिवारी सकाळी राज्याचे समाजकल्याण आयुक्त मिलिंद शंभरकर यांनी थेट संवाद साधला. यावेळी विद्यार्थिनींनीही पटापट उत्तरे देत त्यांचे समाधान केले.
नाशिक : आपल्यापैकी कोण सीईटी परीक्षेची तयारी करत आहे? क्लास लावला आहे का? अभ्यासिका चांगली आहे का? इंटरनेट सुविधा आहे का? जेवण चांगले आहे का? स्वच्छता चांगली आहे का? परिसर कसा आहे? असल्या प्रकारच्या एकामागोमाग एक असंख्य प्रश्नांची सरबत्ती करून आस्थेवाईकपणे मुलींशी शनिवारी सकाळी राज्याचे समाजकल्याण आयुक्त मिलिंद शंभरकर यांनी थेट संवाद साधला. यावेळी विद्यार्थिनींनीही पटापट उत्तरे देत त्यांचे समाधान केले. राज्याचे समाज कल्याण आयुक्त मिलिंद शंभरकर यांनी शनिवारी सकाळी समाज कल्याण विभागाच्या नाशिक - पुणे रस्त्यावरीलमुलींच्या शासकीय वसतिगृहास अचानक भेट दिली. अधिकाऱ्यांशी चर्चा करण्याऐवजी शंभरकर यांनी थेट मुलींच्या वसतिगृहाला भेट दिली. त्यावेळी त्यांनी विद्यार्थिनींशी व्यक्तिगत पातळीवर संवाद साधताना त्यांना मिळणाया सुखसोयींबरोबरच शैक्षणिक प्रगतीबाबत तसेच भवितव्याबाबत चर्चा केली. यावेळी प्रादेशिक उपआयुक्त राजेंद्र कलाल, विशेष अधिकारी देवीदास नांदगावकर, गृहप्रमुख सरिता रेड्डी, सविता गवारे, नंदा रायते व सुभाष फड आदी उपस्थित होते. यावेळी आयुक्त मिलिंद शंभरकर यांनी शासकीय वसतिगृहाचा फेरफटका मारला. मुलींच्या निवास रूममधील सुविधांची पाहणी करून वसतिगृहाच्या स्वच्छतेबाबत उपस्थित गृहप्रमुखांना सूचना दिल्या.
समस्या जाणून घेतल्या
यावेळी शंभरकर यांनी मुलींना आपली नियमित आरोग्य तपासणी होते? हिमोग्लोबीन तपासणी केव्हा झाली? वसतिगृहाच्या वेळापत्रकात आरोग्य तपासणी समाविष्ट असते? असे प्रश्न विचारून त्यांनी मुलींच्या आरोग्याच्या समस्या जाणून घेतल्या. वसतिगृहातील आहार पुरेसा आहे का? आपणास नास्त्यात दूध, अंडी, फळे नियमित भेटतात का ? संगणक रूममध्ये इंटरनेट सुविधा आहे का? अभ्यासिकेत पुस्तके आहेत का ? आपण स्पर्धा परीक्षा पुस्तके वापरता का ? अशाप्रकारे संवाद साधत आयुक्तांनी उपस्थित विद्यार्थिनींना परीक्षांच्या शुभेच्छा दिल्या.