चोथानी परिवाराकडून कोरोना रुग्णांना अन्नसेवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2021 04:11 AM2021-05-31T04:11:18+5:302021-05-31T04:11:18+5:30
सर्वत्र कोरोनाने थैमान घातले असतानाच या कठीण काळात माणुसकीचा ओलावाही टिकून आहे. लासलगाव येथील चोथानी परिवार आणि मित्र ...
सर्वत्र कोरोनाने थैमान घातले असतानाच या कठीण काळात माणुसकीचा ओलावाही टिकून आहे. लासलगाव येथील चोथानी परिवार आणि मित्र मंडळाकडून कोरोना रुग्णांची दोन वेळच्या जेवणाची विनामूल्य व्यवस्था गेल्या एक ते दीड महिन्यापासून सुरू आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने संपूर्ण कुटुंब व्यवस्था हादरून गेली असताना हॉस्पिटलला दाखल झालेल्या रुग्णांना व त्यांच्या नातेवाइकांना सकस जेवण येथील चोथानी परिवार आणि मित्र मंडळी उपलब्ध करून देत आहे.
लासलगाव येथील लोटस हॉस्पिटल, कृष्णाई हॉस्पिटल व लासलगाव मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल याठिकाणी दोनवेळचे ७० ते ८० जेवणाचे डबे या उपक्रमातून पुरवले जात आहेत. वरण, भात, पोळी, भाजी, खिचडी, सलाड, ताक, चटणी, कांदा, लिंबू व्यवस्थित पॅक करून रुग्णांना दोनवेळचे गरम जेवण पुरविले जाते. आजपर्यंत दोन ते अडीच हजार रुग्णांनी या सेवेचा लाभ घेतला आहे.
विंचूर रोडवरील चोथानी यांच्या कांद्याच्या खळ्यात भोजन बनवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यासाठी चोथानी कुटुंबाने त्यात दिवस-रात्र झोकून दिले आहे. या उपक्रमासाठी पुरुषोत्तम चोथानी, प्रतीक्षा चोथानी, ओम चोथानी, प्रतीक्षा चोथानी, गायत्री चोथानी, प्रतीक चोथानी, भगवती राणा, श्यामलता उपाध्ये, विशाल पालवे, सुरज नाईक, अजिंक्य खांगळ, अभिजित जाधव, सुरज आब्बड, त्र्यंबक उपाध्ये, सागर चोथानी, प्रियंका चोथानी, समीर गुंजाळ, अमित वर्मा, प्रमोद खाटेकर, सपना चोथानी, कृष्णा चोथानी यांच्यासह अनेकांचा सहभाग आहे.
इन्फो
कामगारांनाही मदतीचा हात
विशेष म्हणजे या परिवाराने कोरोनाच्या पहिल्या लाटेत परप्रांतीय कामगारांना त्यांच्या राज्यात पोहोचविण्याची तसेच त्यांच्या दोनवेळच्या जेवणाची व्यवस्था केली होती. कोणताही आर्थिक मोबदला न घेता स्वखर्चाने वेगवेगळ्या राज्यांत या कामगारांना पोहोचवण्यात आले होते.
विशेष म्हणजे हे कार्य चालू असताना परिसरात कोणत्याही मुक्या जनावरांना अपघात किंवा व्याधी झालेली असल्यास या ग्रुपकडून सेवा दिली जात आहे.
कोट....
विश्वव्यापी कोरोना संकटामुळे अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली आहेत. माझे कुटुंब व मित्र परिवाराच्या मदतीने हे समाजहिताचे कार्य मी पार पाडत आहे. कोरोनाचा पूर्णपणे नायनाट होत नाही, तोपर्यंत हे कार्य चालू ठेवणार आहोत.
- पुरुषोत्तम चोथानी, लासलगाव
कोट.... या उपक्रमात जेवणाच्या सुविधेबरोबरच रुग्णांच्या नातेवाइकांना हॉस्पिटल उपलब्ध करून देणे, ऑक्सिजन सिलिंडर, औषधे व येणाऱ्या अडचणी यासाठी आम्ही मोठ्या प्रमाणात मदतकार्य करत आहोत.
- विशाल पालवे, लासलगाव
फोटो - २९ लासलगाव चोथाणी
कोरोना रुग्णांसाठी जेवणाची सुविधा उपलब्ध करून देताना चोथानी परिवार व अन्य.
===Photopath===
290521\494529nsk_33_29052021_13.jpg
===Caption===
फोटो - २९ लासलगाव चोथाणी कोरोना रुग्णांसाठी जेवनाची सुविधा उपलब्ध करून देतांना चोथानी परिवार व अन्य.