कामगारांचे वेतन वाढीसाठी अन्नत्याग आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2019 09:27 PM2019-01-17T21:27:25+5:302019-01-17T21:32:37+5:30
वाडिव-हे : गोन्दे औद्योगिक वसाहतीतिल सॅमसोनाइट साऊथ एशिया प्रा.ली.कंपनीतिल कामगार व व्यवस्थापन यांच्यात जानेवारी २०१८ पासून नवीन वेतन कराराची बोलणी सुरु असून कंपनी व्यवस्थापन आणि कामगार यांच्यातील बोलणी फिस्कटल्याने कामगारांनी काम सुरु ठेवून अंतर्गत उपोषण सुरु केले असल्याची माहिती कामगारानी निवेदनाद्वारे दिली आहे.

इगतपुरी तालुक्यातील गोंदे दुमाला औद्योगिक वसाहतीतिल सॅमसोनाइट साऊथ एशिया ही नामांकित कंपनी आहे,या कंपनीतिल कामगार सीटू कामगार संघटनेचे सभासद आहेत. १९९७ पासून ते २०१७ या कालावधीत पाच वेतनवाढीचे करार आतापर्यंत झाले आहेत. मागील कराराची मुदत संपल्याने कामगारांनी वेतनवाढ करार करण्यासाठी बोलणी सुरु केली. कंपनी प्रशासनाने उत्पादन वाढीसाठी आग्रह धरला, कामगारांनी उत्पादन वाढ सुरु केली मात्र कंपनी प्रशासन आणखी उत्पादन वाढीची मागणी करत असल्याने बोलणी फिस्कटली त्यामुळे उपोषणाचा मार्ग अवलंबिल्याचे कामगारांनी सांगितले.
त्यामुळे कायम स्वरूपी कामगारांनी औद्योगिक शांतता कायम रहावी यासाठी कामकाज सुरळीत ठेवून व उत्पादन सुरु ठेवून कंपनीच्या वेळेत काम करत असतांना अन्नत्याग आंदोलन सुरु केले आहे. त्यामध्ये चहा, नाश्ता जेवण न करण्याचा निर्णय घेवून कंपनीअंतर्गत उपोषणाचा मार्ग अवलंबला असल्याची माहिती निवेदनाद्वारे दिली आहे. निवेदनाच्या प्रति तहसीलदार, कामगार उपायुक्त, पोलिस स्टेशन, कंपनी प्रशासन यांना देण्यात आल्याची माहिती कामगार प्रतिनिधीने दिली आहे.