सहा महिने पुरेल इतका अन्नसाठा उपलब्ध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2020 11:26 PM2020-03-24T23:26:56+5:302020-03-25T00:15:50+5:30
सहा महिने पुरेल एवढे अन्नधान्य उपलब्ध असल्याने नागरिकांनी काळजी करू नये. त्यासाठी किराणा दुकानांवर गर्दी करू नये, असे आवाहन पालकमंत्री तथा अन्ननागरीपुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे.
नाशिक : सहा महिने पुरेल एवढे अन्नधान्य उपलब्ध असल्याने नागरिकांनी काळजी करू नये. त्यासाठी किराणा दुकानांवर गर्दी करू नये, असे आवाहन पालकमंत्री तथा अन्ननागरीपुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे.
अन्नधान्य, भाजीपाला अन्य जीवनावश्यक वस्तू मिळणारी दुकाने तसेच दवाखाने, मेडिकल सेवा संचारबंदीतून वगळण्यात आल्या आहेत. या सेवा सुरळीत सुरू राहण्यासाठी प्रशासनास सहकार्य करावे. भाजीपाला, कांदा, बटाटा मार्केट बंद नाहीत. त्या ठिकाणी माथाडी कामगार कामावर जात असतील तर त्यांना सहकार्य प्रशासन करेल. शेतकरीदेखील थेट ग्राहकांना भाजीपाला विकू शकतात, परंतु गर्दी होणार नाही याची काळजी घेणे गरजेचे आहे. जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरू ठेवण्यासाठी पोलीस व यंत्रणांनी कार्यवाही करावी, अशा सूचना दिल्या असल्याचेही भुजबळ यांनी सांगितले आहे.
गांभीर्य लक्षात घेऊन सामाजिक संस्थांनी सहकार्य केल्यास वातावरण सुरळीत होण्यास मदत होईल. जीवनावश्यक वस्तू जास्त भावाने विकल्या जाण्याच्या तक्र ारी येत आहेत. जीवनावश्यक वस्तूंमध्ये मास्क आणि सॅनिटायझर यांचा समावेश असल्याने काळाबाजार झाल्यास सात वर्षांची शिक्षा ठोठावण्यात येईल, असेही भुजबळ यांनी सांगितले आहे.