अजय-अतुल त्र्यंबकराजाच्या चरणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2020 23:58 IST2020-01-08T23:57:26+5:302020-01-08T23:58:08+5:30
मराठी व हिंदी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध संगीतकार अजय-अतुल यांनी बुधवारी त्र्यंबकेश्वर येथे दर्शनार्थ भेट दिली. त्यांनी त्र्यंबकराजाला रु द्राभिषेक केला.

भगवान त्र्यंबकेश्वराचे सुप्रसिद्ध संगीतकार अजय-अतुल यांनी दर्शन घेतले. त्याप्रसंगी देवस्थानतर्फेत्यांचा सत्कार करताना विश्वस्त प्रशांत गायधनी, दिलीप तुंगार व मयूर थेटे.
त्र्यंबकेश्वर : मराठी व हिंदी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध संगीतकार अजय-अतुल यांनी बुधवारी त्र्यंबकेश्वर येथे दर्शनार्थ भेट दिली.
त्यांनी त्र्यंबकराजाला रु द्राभिषेक केला. यावेळी पूजेचे पौरोहित्य सचिन ढेरगे, मयूर थेटे यांनी केले. पूजा संपल्यानंतर देवस्थान कार्यालयात विश्वस्त दिलीप तुंगार व प्रशांत गायधनी यांनी शाल श्रीफळ पुष्पहार व भगवान त्र्यंबकराजाची प्रतिमा भेट देऊन सत्कार करण्यात आला. भगवान त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग आगळे वेगळे असून, मंदिर शिल्पकलेचा अप्रतिम नमुना आहे. आम्ही यापूर्वीही दर्शनासाठी येथे येऊन गेलो आहे. बऱ्याच दिवसांनंतर आलो. दर्शन घेऊन आत्मिक समाधान वाटल्याचे अजय अतुल यांनी सांगितले.