पायी उलटे चालणारा ‘स्वयं साई’ गुरुजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2018 12:44 AM2018-07-25T00:44:20+5:302018-07-25T00:44:35+5:30
मी उलटा चललो आहे हे तुम्हाला सर्वांना दिसते, समजते ना मग तुम्ही सर्व सरळ मार्गाने चला हा संदेश देण्यासाठी गुजराथ भरूच येथील संत श्री सद्गुरू स्वयंम साई गुरूजी गुरूपौर्णिमेनिमित्त मंगळवारी नाशिक-पुणे महामार्गाने शिर्डीला दर्शनासाठी रवाना झाले. गेल्या ४३ वर्षापासून ‘तुम्ही सर्व सरळ मार्गाने चला’ हा संदेश देण्यासाठी वर्षातून पाचवेळा उलटे चालत शिर्डीला जातात.
नाशिकरोड : मी उलटा चललो आहे हे तुम्हाला सर्वांना दिसते, समजते ना मग तुम्ही सर्व सरळ मार्गाने चला हा संदेश देण्यासाठी गुजराथ भरूच येथील संत श्री सद्गुरू स्वयंम साई गुरूजी गुरूपौर्णिमेनिमित्त मंगळवारी नाशिक-पुणे महामार्गाने शिर्डीला दर्शनासाठी रवाना झाले. गेल्या ४३ वर्षापासून ‘तुम्ही सर्व सरळ मार्गाने चला’ हा संदेश देण्यासाठी वर्षातून पाचवेळा उलटे चालत शिर्डीला जातात. गुजराथ भरूच येथे राहाणारे संत श्री सद्गुरू स्वयंम साई गुरूजी हे गेल्या ४३ वर्षापासून भरूच येथुन शिर्डीला दर्शनासाठी उलटे चालत जातात. वर्षातून गुरूपौर्णिमा, रामनवमी, दसरा, दत्तजयंती व दिपावली या सणाला साई गुरूजी हे गुजराथ भरूच येथुन शिर्डीपर्यंत ५६० किलोमीटर उलटे चालत श्री साईबाबांचे दर्शन घेतात. गेल्या गुरूवारी (१२ जुलै) भरूच येथुन निघालेले साई गुरूजी मंगळवारी दुपारी नाशिक-पुणे महामार्गाने शिर्डीकडे रवाना झाले. उलटे चालत शिर्डीला जाणाऱ्या साई गुरूजी यांची रस्त्याने येणारे-जाणारे याबाबत विचारणा करून माहिती जाणुन घेत. अनेकांनी साई गुरूजी यांचे फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावरून व्हायरल केले. शिर्डीला उलटे पायी चालत जाणाºया साई गुरूजींबाबत माहिती असलेले काही जण त्यांची आपल्या भागातून जातांना आस्थेने चौकशी करत होते. सर्वांनी सरळ मार्गाने चालावे हा संदेश देण्यासाठी ५६० किलोमीटर उलटे चालत शिर्डीला दर्शनासाठी जाणारे साई गुरूजी चर्चेचा विषय ठरले होते.
४३ वर्षांपासून उलटी यात्रा
आपल्या उलट्या पायी प्रवासाबाबत बोलतांना साई गुरूजी म्हणाले की, मी कोणाला सांगत नाही उलटे चला, पण तुम्हाला सर्वांना दिसते व समजंत आहे ना मी उलटे चालत आहे, मग तुम्ही सर्व सरळ मार्गाने चला हा संदेश देण्यासाठी मी गेल्या ४३ वर्षापासून उलटे चालत शिर्डीत श्री साईबाबांच्या दर्शनासाठी येतो.