देवळा तालुक्यात हेल्मेट, शिट बेल्ट सक्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2019 06:01 PM2019-01-31T18:01:15+5:302019-01-31T18:01:36+5:30
देवळा : देवळा शहर व तालुक्यात एक फेब्रवारीपासून विना हेल्मेट दुचाकीस्वार व सिटबेल्टचा वापर न करणाऱ्या चारचाकी वाहन चालकांविरूध्द विशेष अभियान राबविण्यात येणार असल्याची माहिती पोलिस निरीक्षक सुरेश सपकाळे यांनी दिली.
देवळा : देवळा शहर व तालुक्यात एक फेब्रवारीपासून विना हेल्मेट दुचाकीस्वार व सिटबेल्टचा वापर न करणाऱ्या चारचाकी वाहन चालकांविरूध्द विशेष अभियान राबविण्यात येणार असल्याची माहिती पोलिस निरीक्षक सुरेश सपकाळे यांनी दिली.
नाशिक शहरात हेल्मेट सक्ती व सिट बेल्ट बाबत नियमांचे उल्लंघन करणार्या वाहनचालकांवर दंडात्मक व न्यायिक कारवाई करण्यात येते. यामुळे वाहनचालकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळून शहरी भागात होणार्या अपघातात जिवित हानी होण्याच्या घटनांचे प्रमाण कमी झाले. ग्रामीण भागात मात्र वाहनचालकांकडून सर्रास नियमांचे उल्लंघन होतांना दिसते, यामुळे अनेक अपघात घडून येतात व हकनाक माणसे बळी जातात. यामुळे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात दिनांक १ फेब्रुवारी २०१९ पासून हेल्मेट सक्तीबाबत विशेष अभियान राबविण्यात येणार आहे.
देवळा तालुक्यात पोलिस ठाण्यातर्फे भित्तीपत्रके लावून जनजागृती करण्यात येत आहे. सदर मोहिमेदरम्यान मोटार वाहन नियमांचे उल्लंघन करण्याºया वाहनचालकांवर कारवाई करण्यात येणार आहे. विशेष करुन मोटारसायकलस्वाराने हेल्मेट न घालणे, चारचाकी वाहनावरील चालकांनी शिट बेल्टन लावता वाहन चालविणे या बाबी निदर्शनास आल्यास संबंधितांवर दंडात्मक व कायदेशिर कारवाई करण्यात येणार आहे. जनजागृतीसाठी वाहन चालकांसाठी संपूर्ण शहर व तालुक्यातील दर्शनी भागात वाहतूक नियम व हेल्मेट सक्ती विषयी मार्गदर्शक भित्तीचित्रे लावण्यात आले आहेत.
(फोटो ३१ आरटीओ) देवळा येथे एका वाहनाला भित्तीपत्रक लावतांना पोलिस कर्मचारी.