सेना खासदारांची गडकरींकडून पाठराखण

By admin | Published: July 25, 2014 11:56 PM2014-07-25T23:56:38+5:302014-07-26T00:49:11+5:30

सेना खासदारांची गडकरींकडून पाठराखण

Force members of army personnel from Gadkari | सेना खासदारांची गडकरींकडून पाठराखण

सेना खासदारांची गडकरींकडून पाठराखण

Next

नाशिक : कॉँग्रेस-राष्ट्रवादीने जातीयवाद आणि आरक्षणाचा उपयोग करून नेहमीच मतांचे राजकारण केले. भाजपा-सेनेला बदनाम करण्याचा प्रयत्न केला. दिल्लीतील महाराष्ट्र सदनातील चपाती प्रकरणालाही विरोधकांकडून जातीयवाद आणि सांप्रदायिकतेचा रंग दिला जात असल्याचे सांगत केंद्रीय रस्ते वाहतूक व ग्रामविकासमंत्री नितीन गडकरी यांनी सेना खासदारांची पाठराखण केली. नाशिक महानगर भारतीय जनता पार्टीच्या वतीने आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना गडकरी यांनी कॉँग्रेस-राष्ट्रवादीवर टीकास्त्र सोडले.
पंचवटीतील स्वामिनारायण मंदिराच्या सभागृहात आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना नितीन गडकरी यांनी सांगितले, देशातील गरिबी, भूकबळी, बेरोजगारी याला कॉँग्रेस-राष्ट्रवादी जबाबदार आहे. चुकीची आर्थिक धोरणे, भ्रष्ट प्रशासन, दृष्टिहीन नेतृत्व, निर्णय न घेणारे सरकार म्हणून कॉँग्रेस आघाडी सरकारची ख्याती होती. त्यामुळेच जनतेने न्याय देणारे पुरोगामी, प्रगतिशील सरकार सत्तेवर आणले आहे. भाजपावर कुणा एकाची मालकी नाही. तो कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. भाजपाने विकासाच्या राजकारणावर भर दिला आहे. त्यामुळे जनतेला विकासाचे राजकारण आणि जातीयवादाचे राजकारण यातील फरक समजावून सांगण्याची गरज निर्माण झाली आहे.
भाजपा सरकारने सत्तेवर आल्यानंतर शेतकऱ्यांना एक लाख सोलर पंप देण्याचे ठरविले आहे. अर्थमंत्र्यांनी यंदाच्या अर्थसंकल्पात प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेसाठी १९ हजार कोटींची तरतूद केली आहे.


फलोत्पादनाच्या योजना आखण्यात आल्या आहेत. शेतमाल दीर्घकाळ टिकावा यासाठी शेतकऱ्यांनी तंत्रज्ञानाची कास धरली पाहिजे. त्यासाठी देशभरातील १६०० तरुण उद्योजक-संशोधक यांना एकत्र आणून दिल्लीतील प्रगती मैदानावर प्रदर्शन भरविण्याचा मनोदयही गडकरी यांनी व्यक्त केला. जनतेने आपल्या मनातल्या नवीन कल्पना कळवाव्यात, सरकार त्याचा निश्चितच उपयोग करेन असे सांगत गडकरी म्हणाले, महाराष्ट्रात आता विधानसभा निवडणुकीचा बॅँडबाजा वाजला आहे. एकेकाळी सुखी-समृद्ध असलेल्या महाराष्ट्राची स्थिती खूप वाईट बनली आहे. राज्यातील वीजप्रकल्प, उद्योग बंद पडले आहेत. गुंतवणूक थांबली आहे. त्यामुळे अकार्यक्षम असे कॉँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार हटवून शिवशाही आणण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. लोकसभा निवडणुकीतील यशामुळे गाफील न राहता विधानसभा निवडणुकीत जेथे-जेथे युतीचे उमेदवार असतील त्यांच्या पाठीशी शक्ती उभी करण्याचे आवाहनही गडकरी यांनी केले. स्वागत व प्रास्ताविक शहराध्यक्ष लक्ष्मण सावजी यांनी, तर सूत्रसंचालन सुनील केदार यांनी केले. नाना शिलेदार यांनी आभार मानले. व्यासपीठावर खासदार हरिश्चंद्र चव्हाण, माजी खासदार प्रतापदादा सोनवणे, उपमहापौर सतीश कुलकर्णी, माजी मंत्री डॉ. दौलतराव अहेर, आमदार अपूर्व हिरे, संघटनमंत्री राजेंद्र फडके, सुरेशबाबा पाटील, बिरदीचंद नहार, सीमा हिरे, सुहास फरांदे, माजी महापौर बाळासाहेब सानप, विजय साने, सुरेश पाटील आदि उपस्थित होते.
इन्फो
कांदा निर्यातीसाठी प्रयत्न
कांद्याचे उत्पादन वाढले की भाव घसरतात. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होते. जेव्हा अशी परिस्थिती निर्माण होईल तेव्हा कांदा निर्यात सुरू करण्यासाठी सरकार पूर्ण प्रयत्न करेल, असे आश्वासनही नितीन गडकरी यांनी यावेळी बोलताना दिले. शेतमाल दीर्घकाळ टिकवून ठेवणाऱ्या तंत्रज्ञानाचाही शेतकऱ्यांनी उपयोग केला पाहिजे, असा सल्लाही गडकरी यांनी दिला.
इन्फो
मेहनत करे मुर्गा...
नाशिक शहरात राष्ट्रीय महामार्गावर उभ्या राहिलेल्या उड्डाणपुलाबाबत बोलताना गडकरी म्हणाले, या उड्डाणपुलाला वाजपेयी सरकारच्या काळातच मंजुरी मिळालेली आहे. वाजपेयी सरकारने रस्ते जोडण्याचे महत्त्वपूर्ण काम केले. परंतु म्हणतात ना ‘मेहनत करे मुर्गा, अंडा खाए फकीर’ अशी कोटीही त्यांनी भुजबळांचे नाव न घेता केली.

फोटो कॅप्शन- २५ पीएचजेएल १०१

Web Title: Force members of army personnel from Gadkari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.