सटाण्यात जबरी घरफोडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2019 05:40 PM2019-11-24T17:40:11+5:302019-11-24T17:40:57+5:30

सटाणा : शहरात एका बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी घरातील चार लाख रु पयांचा सोन्याचा ऐवज लुटून नेला. ही घटना शहरातील देवळा रस्त्यावरील शाहूनगर येथे रविवारी (दि.२४) सकाळी उघडकीस आली.

Forced robbery in Chattanooga | सटाण्यात जबरी घरफोडी

सटाण्यात जबरी घरफोडी

Next
ठळक मुद्देचोरट्यांनी लुटला चार लाखांचा सोन्याचा ऐवज

सटाणा : शहरात एका बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी घरातील चार लाख रु पयांचा सोन्याचा ऐवज लुटून नेला. ही घटना शहरातील देवळा रस्त्यावरील शाहूनगर येथे रविवारी (दि.२४) सकाळी उघडकीस आली.
शहरातील हॉटेल मोतीमहलनजीकच्या शाहूनगर मधील रिहवाशी विमलबाई भावराव सोनवणे या आपल्या परिवारासह दोन दिवसांपूर्वी लोणी येथे आपल्या नातेवाईकांकडे गेल्या होत्या दरम्यान आज सकाळी शेजारी राहणाऱ्या वंदना सोनवणे यांना विमल यांच्या घराचे दार उघडे असल्याचे आढळून आले.
या प्रकाराबाबत त्यांनी तत्काळ विमलबाई यांना भ्रमणध्वनीवरून माहिती कळवली .विमलबाई गावाहून परत घरी आल्या असता घरातील साहित्य अस्ताव्यस्त पडलेले आणि लोखंडी कपाट तोडल्याचे आढळून.
चोरट्यांनी कपाटातील चार लाख रु पये किंमतीचे पंधरा तोळे सोन्याचा ऐवज लुटून नेल्याचे उघडकीस आले. सटाणा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक देवेंद्र शिंदे यांनी घटनेचे माहिती मिळताच तत्काळ घटनास्थळी पाहणी करून श्वानपथक पाचारण केले.
यावेळी श्वानपथकाने देवळा रस्त्यापर्यंत चोरट्यांचा माग दाखवला. चोरट्यांनी वाहनाचा वापर केल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. या जबरी चोरीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून पोलिसांच्या वाहन संख्येत वाढ करून त्यानुसार गस्तीपथक ठेवावेत अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. याप्रकरणी सटाणा पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरु द्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक नंदलाल गायकवाड करीत आहेत.

(फोटो २४ सटाणा, २४ सटाणा १)
सटाणा शहरातील शाहूनगर मधील रिहवाशी विमलबाई सोनवणे यांच्या घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यानी अस्ताव्यस्त केलेले साहित्ये व कपाटाचे तोडलेले लॉकर दिसत आहे.
 

Web Title: Forced robbery in Chattanooga

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.