विवाहीतेचे दागीने लुटणाऱ्या संशयीतावर जबरी लुटीचा गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2020 05:50 PM2020-06-23T17:50:19+5:302020-06-23T17:50:45+5:30

वणी : दिंडोरी तालूक्यातील सारसाळे येथुन कोल्हेर येथे भावाला भेटण्यासाठी रात्रीच्या सुमारास जाणाºया महीलेचा पाठलाग करीत मागील वादाची कुरापत काढुन सोन्याची पोत व मंगळसूत्र असा ५६ हजाराचा ऐवज पळविणाºया संशयिताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Forced robbery on suspicion of robbing a married woman of her jewelery | विवाहीतेचे दागीने लुटणाऱ्या संशयीतावर जबरी लुटीचा गुन्हा

विवाहीतेचे दागीने लुटणाऱ्या संशयीतावर जबरी लुटीचा गुन्हा

Next
ठळक मुद्दे वणी पोलिसांत जबरी चोरीचा गुन्हा दाखल

लोकमत न्युज नेटवर्क
वणी : दिंडोरी तालूक्यातील सारसाळे येथुन कोल्हेर येथे भावाला भेटण्यासाठी रात्रीच्या सुमारास जाणाºया महीलेचा पाठलाग करीत मागील वादाची कुरापत काढुन सोन्याची पोत व मंगळसूत्र असा ५६ हजाराचा ऐवज पळविणाºया संशयिताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत माहीती अशी जिवलाबाई गुंजाळ (३०) राहणार सारसाळे या कोल्हेर येथे भावाला भेटण्यासाठी जात असताना माळे ते कोल्हेर जाणाºया कच्या रस्त्यावर कोल्हेर शिवारात (एम एच १५ इ डी ७१३८) दुचाकीवरु न प्रकाश नथु गायकवाड हा पाठलाग करीत आला व तुझ्या भावाने तीन वर्षापुर्वी माझेवर केस केली होती व त्यावेळी पोलीस ठाण्यात तु मला मारले होते अशी कुरापत काडून थांब आता तुझा बेत पाहतो असे बोलत सदर महिलेचा हात पिरगाळला व गळ्यातील २५ हजार रु पये किमतीची सोन्याची पोत व २१ हजार रु पये किमते मंगळसूत्र असे सुमारे ५६ हजाराचे सुवर्णलंकार जबरीने घेऊन त्याने पळ काढल्याची फिर्याद जिवलाबाईने वणी पोलिसांत दिल्याने प्रकाश गायकवाड याच्या विरोधात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत उपविभागीय अधिकारी सदाशिव वाघमारे यांचे मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक सागर शिंपी व पोलिस उप निरीक्षक योगेश शिंदे अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Forced robbery on suspicion of robbing a married woman of her jewelery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.