गोल्हेवाडी येथे जबरी चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2020 08:46 PM2020-04-18T20:46:05+5:302020-04-19T00:42:42+5:30

येवला : तालुक्यातील गोल्हेवाडी (महालगाव) मातोलठाण रोडवरील बंद घराची कडी तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला. घरातील लाकडी कपाट व लोखंडी कोठीमधील तब्बल पाच तोळे सोने व तीन लाख रु पये रकमेवर चोरट्यांनी डल्ला मारला आहे.

 Forcible theft at Golhewadi | गोल्हेवाडी येथे जबरी चोरी

गोल्हेवाडी येथे जबरी चोरी

googlenewsNext

येवला : तालुक्यातील गोल्हेवाडी (महालगाव) मातोलठाण रोडवरील बंद घराची कडी तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला. घरातील लाकडी कपाट व लोखंडी कोठीमधील तब्बल पाच तोळे सोने व तीन लाख रु पये रकमेवर चोरट्यांनी डल्ला मारला आहे. एकुण ४ लाख ७७ हजाराच्या मुद्देमाल चोरट्यांनी चोरु न नेला आहे. ही घटना शुक्र वारी पहाटेच्या दरम्यान घडली. याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गोल्हेवाडी येथील दिलीप बबन जाधव यांच्या घराचा कडी तोडून चोरट्यांनी शुक्र वारी रात्री १०.३० ते पहाटे २.३० वाजेच्या दरम्यान घरात प्रवेश केला. घरातील लाकडी कपाट व लोखंडी कोठी मधील ३ लाख रोख रक्कम, ४५ हजार किंमतीचा १.५ तोळ्याचा सोन्याचा नेकलेस, ३० हजार रु पयाची एक तोळ्याची सोन्याची अंगठी, १५ हजार
रु पयाची ५ ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी, चोरली. दिलीप जाधव यांचे सर्व सदस्य उन्हाळा असल्यामुळे घरच्या छतावर झोपलेले होते. जाधव यांनी तीन लाख रु पये ही रक्कम ही ट्रॅक्टर घेण्यासाठी घरी आणून ठेवली होती. चोरी झाल्यानंतर लगचे दिलीप जाधव यांनी पोलीस पाटील किरण कोतकर यांना माहिती दिली. पोलीस पाटील कोतकर यांनी तत्काळ पोलीस निरीक्षक अनिल भवारी यांना याबाबत माहिती कळविली. याप्रकरणी दिलीप जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीवरु न अज्ञात चोरट्यां विरु द्ध तालुका पोलिस पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनास्थळी मनमाड उपविभागीय पोलीस अधिकारी समींरिसंह साळवे, अनिल भवारी, सहाय्यक पोलिस निरीक्षक एकनाथ भिसे यांनी भेट देऊन माहिती घेतली. पोलीस निरीक्षक भवारी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक भिसे अधिक तपास करीत आहे.

Web Title:  Forcible theft at Golhewadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक