मांडूळ साप वनविभागाच्या ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 01:03 IST2021-03-30T21:25:27+5:302021-03-31T01:03:25+5:30
पिंपळगाव बसवंत : निफाड तालुक्यातील उंबरखेड शिवारात साडे चार फूट लांबीचा व साडे तीन किलो वजनाचा मांडूळ जातीचा सर्प शेतकरी पंढरीनाथ गणपत निरगुडे यांच्या मळ्यात आढळून आल्याने त्यांनी तातडीने तो सर्प वन्यजीव संरक्षक यांच्या मदतीने वन विभागाच्या ताब्यात दिला आहे.

मांडूळ साप वनविभागाच्या ताब्यात
पिंपळगाव बसवंत : निफाड तालुक्यातील उंबरखेड शिवारात साडे चार फूट लांबीचा व साडे तीन किलो वजनाचा मांडूळ जातीचा सर्प शेतकरी पंढरीनाथ गणपत निरगुडे यांच्या मळ्यात आढळून आल्याने त्यांनी तातडीने तो सर्प वन्यजीव संरक्षक यांच्या मदतीने वन विभागाच्या ताब्यात दिला आहे.
उंबरखेड शिवारातील शेतकरी पंढरीनाथ गणपत निरगुडे यांच्या मळ्यात मांडूळ जातीचा दुर्मीळ सर्प आढळून आल्याने त्यांनी तातडीने याबाबत पिंपळगाव पोलीस ठाण्यासह स्थानिक वन्यजीव रक्षक पिंटू पवार, विक्रम गीते, भैया महाले यांना माहिती दिली. उंबरखेड येथील पोलीस पाटील निशांत मोरे यांच्या मदतीने तो सर्प वन विभागाचे नाना चौधरी, वाल्मिक व्हर्जन, वसंत देवरे यांच्या ताब्यात सुपुर्द केला.