पेठच्या लाल मातीतील केशर आंब्याची परदेशी नागरिकांना भुरळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2021 04:12 AM2021-07-01T04:12:04+5:302021-07-01T04:12:04+5:30
चौकट- १५० रु. किलोचा दर कोरोनामुळे द्राक्ष निर्यातीला फटका बसला असला, तरी पेठमधील केशर आंब्याची मात्र चांगली निर्यात झाली. ...
चौकट-
१५० रु. किलोचा दर
कोरोनामुळे द्राक्ष निर्यातीला फटका बसला असला, तरी पेठमधील केशर आंब्याची मात्र चांगली निर्यात झाली. निर्यातक्षम आंब्याला १५० पासून १०० रुपये किलोचा दर शेतकऱ्यांना मिळाला, शिवाय व्यापारी जागेवर येऊन खरेदी करत असल्यामुळे वाहतूक आणि इतर खर्चाचीही बचत झाल्याने शेतकऱ्यांच्या हाती दोन पैसे शिल्लक राहिले.
कोट-
माझी दोन-अडीच एकरची आंबा बाग आहे. साधारणत: १,५०० केशर आंब्याची झाडे लावलेली आहेत. या बागेपासून मला पाच ते सहा टन उत्पादन मिळाले. त्यातील काही माल मुंबईच्या कंपनीने सुरुवातीला १५० रुपयांनी खरेदी केला. तो संपूर्णपणे निर्यात झाला. त्यानंतर, काही माल सह्याद्री ॲग्रो कंपनीला दिला होता, तोही निर्यात झाला. आंब्याची शेती पार्टटाइम म्हणूनही करता येते. कमी खर्च आणि कमी मेहनतीत चांगले उत्पन्न मिळत असल्याने, आदिवासी शेतकऱ्यांना हे पीक खूपच परवडत आहे. येथील आंब्याची चव कोकण आणि गुजरात येथील आंब्यांपेक्षा वेगळी असल्याने आमच्या आंब्याला परदेशात चांगली मागणी आहे.
- पद्माकर गवळी, आंबा उत्पादक शेतकरी, करंजाळी, ता.पेठ
चौकट-
कृषी विभागाने रोख रक्कम द्यावी
फळबाग लागवडीसाठी कृषी विभागाकडून मदत केली जात असली, तरी त्याच्या किचकत पद्धतीमळे सहसा कुणा ते घेण्यास धजावत नाही. कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना रोपे दिली जातात, पण अनेक वेळा ही रोपे खराब निघतात. रोपे देण्यापेक्षा कृषी विभागाने रोख रक्कम दिल्यास शेतकरी आपल्या पद्धतीने रोपे खरेदी करू शकतील.