वनाधिपती विनायकदादा पाटील पंचत्वात विलीन; शासकिय इतमामात अंत्यसंस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2020 01:38 PM2020-10-24T13:38:42+5:302020-10-24T13:44:37+5:30

शनिवारी सकाळी नाशिक अमरधाममध्ये दादांचे नातू हर्ष गरुड यांच्या हस्ते त्यांच्या पार्थिवाला अग्नीडाग देण्यात आला. यावेळी पोलीसांच्या तुकडीने तीन फैरी आकाशात झाडून दादांना अखेरची मानवंदना दिली,

Forest chief Vinayakdada Patil merged into Panchatvat; Funeral at Nashik Amardham in Government protocol | वनाधिपती विनायकदादा पाटील पंचत्वात विलीन; शासकिय इतमामात अंत्यसंस्कार

वनाधिपती विनायकदादा पाटील पंचत्वात विलीन; शासकिय इतमामात अंत्यसंस्कार

googlenewsNext
ठळक मुद्देपोलीसांच्या तुकडीने तीन फैरी आकाशात झाडून अखेरची मानवंदना दिलीजिल्ह्याचे पितृतुल्य नेतृत्व हरपले दादांच्या अंतिम इच्छेनुसार त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

नाशिक :नाशिकचे सांस्कृतिक, साहित्यिक वैभव तसेच जिल्ह्याचे पितृतुल्य नेतृत्व माजी मंत्री वनाधिपती विनायकदादा पाटील यांच्या पार्थिवावर शनिवारी (दि.२४) सकाळी शोकाकुल वातावरणात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. दादांच्या अशा अचानकपणे जाण्याने नाशिकचा जणू सांस्कृतिक, साहित्यीक आधारवडच उन्मळून पडल्याची शोकभावना उपस्थितांमध्ये होती.
शुक्रवारी रात्री बारा वाजेच्या सुमारास विनायकदादा यांच्या निधनाची वार्ता समजताच त्यांच्या निवासस्थान ह्यकदंबवनह्ण येथे नागरिकांनी गर्दी केली होती. शनिवारी सकाळी नाशिक अमरधाममध्ये दादांचे नातू हर्ष गरुड यांच्या हस्ते त्यांच्या पार्थिवाला अग्नीडाग देण्यात आला. यावेळी पोलीसांच्या तुकडीने तीन फैरी आकाशात झाडून दादांना अखेरची मानवंदना दिली. दादांच्या अंतिम इच्छेनुसार त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.


यावेळी दादांचे बंधू सुरेशबाबा पाटील यांच्यासह पालकमंत्री छगन भुजबळ, खासदार भारती पवार, आमदार देवयानी फरांदे, आमदार सीमा हिरे, आमदार राहुल ढिकले, आमदारदिलीप बनकर,  मविप्रच्या सरचिटणीस निलिमाताई पवार, माजी खासदार देवीदास पिंगळे, माजी आमदार बाळासाहेब सानप, डॉ. शोभा बच्छाव, अनिल कदम, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय, गुरुमीत बग्गा, वास्तुविशारद अमृता पवार, डॉ. प्राची पवार, नाना महाले, अर्जुन टिळे, रवींद्र पगार, हेमलता पाटील,कोंडाजी आव्हाड, ॲड. भगीरथ शिंदे,शाहू खैरे,डॉ. दिनेश बच्छाव, विश्वास ठाकूर, शंकर बोऱ्हाडे, प्रकाश होळकर, प्रा. व्ही. बी. गायकवाड, तुषार पगार, हेमंत पाटील आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

Web Title: Forest chief Vinayakdada Patil merged into Panchatvat; Funeral at Nashik Amardham in Government protocol

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.