वनविभाग शासकीय कार्यालयाची दुरवस्था वणी : जप्त वाहनांसह लाकडांची सुरक्षितता वाºयावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2018 12:10 AM2018-01-05T00:10:44+5:302018-01-05T00:20:18+5:30
वणी : जप्त केलेल्या वनसंपत्तीची सुरक्षित साठवणूक करण्यासाठी कार्यान्वित असलेल्या वनविभागाच्या शासकीय इमारती मालाचे विक्री केंद्रातील कार्यालय भुईसपाट होण्याच्या स्थितीत आहे.
वणी : जप्त केलेल्या वनसंपत्तीची सुरक्षित साठवणूक करण्यासाठी कार्यान्वित असलेल्या वनविभागाच्या शासकीय इमारती मालाचे विक्री केंद्रातील कार्यालय भुईसपाट होण्याच्या स्थितीत असून, एमडी रूम या कार्यालयाचीही तशीच स्थिती झाल्याने कार्यालयीन कामकाज आवारात करण्याची वेळ वनविभागाच्या घटकांवर आली आहे.
वणी-दिंडोरी रस्त्यावर संखेश्वर मंदिरालगत राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यक्षेत्राला खेटून वनविभाग पूर्व भाग यांची साडेसात एकर जागा असून, शासकीय इमारती मालाचे विक्री केंद्र या ठिकाणी कार्यान्वित आहे. वनपरिमंडल अधिकारी १, वनरक्षक ३, वनमजूर ३ असा अधिकारी व कर्मचारी वर्ग कामकाज सांभाळतात. १९६५ साली हे विक्र ी केंद्र याठिकाणी सुरू झाले. मात्र २५० मीटर अंतराला
संरक्षक भिंत नाही तसेच कार्यालय केव्हा कोसळेल याचा नेम नाही. एमडी रूम अखेरच्या घटका मोजत आहे. ही रूम म्हणजे लाकडांचा लिलाव होतो तेव्हा ती रक्कम जमा करून घेण्याची जागा. जप्त केलेल्या लाकडांचा लिलाव तीन ते चार महिन्यांनंतर वरिष्ठ कार्यालयाच्या आदेशाने करण्यात येतो. दरम्यान, नमूद कार्यालयाला टिंबर डेपो असेही संबोधण्यात येते. दिंडोरी वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्या कार्यकक्षेत सदर कार्यालय येते. वनविभाग पूर्व भाग नाशिक व प्रादेशिक दिंडोरी अशी ओळख असलेल्या विक्री केंद्राचे कार्यालय अखेरच्या घटका मोजत असल्याने कार्यालय आवारातच थाटण्यात आले आहे. या सर्व बाबींचा विचार करता अपेक्षित कारवाईचा सूर उमटतो आहे.
दिंडोरी, कळवण व सुरगाणा असे तीन तालुक्यांचे कार्यक्षेत्र असणाºया या केंद्रात नमूद ठिकाणाहून बेकायदा लाकूड वाहतूक करणारी वाहने जप्त करून याठिकाणी ठेवण्यात येतात. त्या जप्त ऐवजाची देखभाल व सुरक्षितता याकडे लक्ष ठेवणे अशी जबाबदारी आहे. जप्त केलेली साठ वाहने असून, १८ दुचाकी व ४२ चारचाकी अशी वर्गवारी आहे. कोट्यवधी रुपये किमतीचे लाकडे याठिकाणी आहेत.