मेशी-डोंगरगाव रस्त्यावरील वनराई हिरवळीने नटली

By admin | Published: November 12, 2016 12:11 AM2016-11-12T00:11:52+5:302016-11-12T00:24:37+5:30

विविध वनौषधी : वृक्षतोड न करण्याचे आवाहन

The forest-dongargaon road is covered with greenery | मेशी-डोंगरगाव रस्त्यावरील वनराई हिरवळीने नटली

मेशी-डोंगरगाव रस्त्यावरील वनराई हिरवळीने नटली

Next

 मेशी : मेशी-डोंगरगाव रस्त्यालगत असलेली सुमारे बाराशे हेक्टरची वनराई यावर्षी चांगला पाऊस झाल्याने कमालीची नटली असून, बऱ्याच वर्षांपासून दुष्काळी वनराई यावर्षी फुलली आहे. मात्र याची संबंधित विभागाने दखल घेऊन लक्ष ठेवले पाहिजे. या वनराईत विविध वनौषधी वनस्पती आहेत. त्यांचे जतन करून वनीकरण अधिक वाढविले पाहिजे. यात वृक्षतोड होऊ नये म्हणून नागरिकांनी जागृत असले पाहिजे.
जंगलात असलेले बंधारे पाण्याने भरलेले आहेत. केवळ विभागाप्रमाणे नागरिकांनी जागृत असले पाहिजे. आणि वनसंपदा जोपासली पाहिजे. संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी ठिकठिकाणी टेहळणी मनोरे उभारले पाहिजे. मेशी-डोंगरगाव रस्त्यावर असलेल्या वनीकरणमध्ये रस्त्यावर बोरांची झाडेही आहेत. सध्या झाडांवरील बोरे पिकली आहेत. डोंगरगाव येथील शालेय मुले मेशी येथील महाविद्यालयात शिक्षण घेण्यासाठी येतात. ते रस्त्याने जाताना वाटेत बोरं खाण्याचा आनंद लुटताना दिसत आहेत. (वार्ताहर)

Web Title: The forest-dongargaon road is covered with greenery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.