डोंगरगावच्या वनराई डोंगराला आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2018 01:31 PM2018-05-08T13:31:59+5:302018-05-08T13:31:59+5:30
मेशी - देवळा तालुक्यातील डोंगरगाव येथील वनराई डोंगरावर लागलेल्या आगीत झाडे झुडपे जळून खाक झाले.
मेशी - देवळा तालुक्यातील डोंगरगाव येथील वनराई डोंगरावर लागलेल्या आगीत झाडे झुडपे जळून खाक झाले. येथील महादू गोपाळा पानसरे यांच्या शेताजवळील डोंगराला दुपारी आग लागल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी सरपंच दयाराम सावंत यांना दूरध्वनीवरून कळविले. लगेचच सरपंच दयाराम सावंत आणि उपसरपंच लालजी सावंत यांनी गावातील नागरिकांना कळविले. त्यावरून नागरिक मोठयÞा प्रमाणावर जमले आणि आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले. यादरम्यान वनविभागाचे कर्मचारी माहिती मिळताच घटनास्थळी पोहोचले. वन विभागाचे लोखंडे, गायकवाड, सोनवणे आणि सरपंच दयाराम सावंत ,उपसरपंच लालजी सावंत आण िनागरिकांनी आग आटोक्यात आणली. सुमारे दोन ते तीन हेक्टर क्षेत्र क्षेत्र आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. डोंगरावरील गवत, झाडे झुडपे जळून खाक झाली. उन्हाळ्याच्या कडक उन्हात आग लागली होती म्हणून विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करावे लागले. आगीचे कारण मात्र समजले नाही. आग लागू नये म्हणून वनविभागाने प्रयत्न करावेत आणि होणारे नुकसान टाळण्यासाठी उपाययोजना करण्यात याव्यात अशी मागणी नागरिकांनी केली आहे.