जंगल संरक्षणासाठी राबणारी ‘वन दुर्गा’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2021 04:14 AM2021-03-07T04:14:11+5:302021-03-07T04:14:11+5:30
नाशिक : सुरगाणा तालुक्यातील प्रतापगड या लहानशा गावातील निरक्षर आदिवासी कटुंबात जन्मलेल्या योगीता गवळी या सहा बहिणी. कुटुंबात योगीता ...
नाशिक : सुरगाणा तालुक्यातील प्रतापगड या लहानशा गावातील निरक्षर आदिवासी कटुंबात जन्मलेल्या योगीता गवळी या सहा बहिणी. कुटुंबात योगीता या दुसऱ्या क्रमांकाची मुलगी. धावण्याची आवड असल्यामुळे त्यांनी तो छंद जोपासला आणि याच छंदाने त्यांना ‘खेळाडू’ म्हणून वनखात्यात वनरक्षक म्हणून चार वर्षांपूर्वी स्थान मिळवून दिले. मोठ्या बहिणीचे लग्न झाल्याने चार बहिणी, आई, वडील या सर्वांची जबाबदारी योगीता यांच्या खांद्यावर आली. कौटुंबिक जबाबदारी निभावताना महाराष्ट्र-गुजरातच्या सीमावर्ती भागातील जंगलाच्या संरक्षणाचीही जबाबदारी त्या समर्थपणे पेलत आहेत. अहोरात्र झटणाऱ्या वन रणरागिणींपैकी योगीता यादेखील एक आहेत. उंबरठाण वनपरिक्षेत्रातील अत्यंत दुर्गम भागात ही ‘वन दुर्गा’ चापावाडी, काठीपाडा या भागातील जंगलांमध्ये दिवस-रात्र गस्त करणे असो किंवा येथील आदिवासींमध्ये मिळून-मिसळून त्यांचे प्रबोधन करत जंगलसंवर्धनासाठी सहभाग वाढविण्यापर्यंत गवळी या प्रयत्नशील आहेत. २०१८ साली त्यांनी या भागातील सागाच्या लाकडांची चोरटी तूट रोखत ट्रॅक्टरमधून वाहून नेणारा साग मोठ्या धाडसाने जप्त केला होता.
--
फोटो आर वर ०६योगीता नावाने सेव्ह आहे.
===Photopath===
060321\06nsk_24_06032021_13.jpg
===Caption===
योगिता गवळी