मातेच्या कुशीतून पळविलेले बालक सापडले जंगलात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2018 01:21 PM2018-05-04T13:21:10+5:302018-05-04T13:21:10+5:30

घोटी : घोटी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या व त्र्यंबकेश्वर तालुक्यामधील दापुरे गावाच्या पाचकुंडल्याची वाडी येथील एका आदिवासी महिलेच्या कुशीतून पळविलेले लहान बालक जवळच जंगलात सापडल्याने खळबळ उडाली आहे.

In the forest found a boy caught in a machete | मातेच्या कुशीतून पळविलेले बालक सापडले जंगलात

मातेच्या कुशीतून पळविलेले बालक सापडले जंगलात

googlenewsNext

घोटी : घोटी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या व त्र्यंबकेश्वर तालुक्यामधील दापुरे गावाच्या पाचकुंडल्याची वाडी येथील एका आदिवासी महिलेच्या कुशीतून पळविलेले लहान बालक जवळच जंगलात सापडले आहे. या घटनेमागे नरबळीसाठी तर बालक पळविले नसावे, अशी शंका उपस्थित केली जात आहे. बालकावर त्र्यंबकेश्वर येथील रु ग्णालयात उपचार सुरू आहेत. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील दापुरे येथील पाचकुंडल्याची वाडी या आदिवासी वस्तीवरील मंगल चौधरी नामक महिला आपल्या चिमुकल्याला कुशिशी घेऊन झोपली असता, रात्री दोन वाजेच्या सुमारास तिच्या कुशीत असलेले बालक कोणीतरी अज्ञातांनी चोरून नेले.दरम्यान या मातेला जाग आली असता, आपल्याजवळ आपले बाळ नसल्याचे समजताच तिने हंबरडा फोडला.यावेळी घरातील सर्व सदस्य जागे झाले त्यांनी बाळाचा सर्वत्र शोध घेतला असता हे बालक जंगलात मिळून आले.दरम्यान या बालकाला आणि मातेला उपचारार्थ त्र्यंबकेश्वर येथील रु ग्णालयात दाखल करण्यात आले असून, या प्रकाराची माहिती समजताच श्रमजीवी संघटनेचे भगवान मधे यांनी मातेची आणि बालकाची भेट घेऊन प्रकृतीची चौकशी केली.
----------------------
बाळ चोरीची सखोल चौकशी करा:-भगवान मधे
त्र्यंबकेश्वर तालुक्यात व परिसरात अंधश्रद्धा मोठ्या प्रमाणात असून यामुळे नरबळी देण्याच्या घटनांत काही दिवसात वाढ झाली आहे.हा प्रकारही नरबळीसाठी केला नसावा ना याबाबत सखोल चौकशी करणे गरजेचे आहे.

Web Title: In the forest found a boy caught in a machete

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक