पर्युषण महापर्वाची वणीत सांगता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2018 11:50 PM2018-09-14T23:50:33+5:302018-09-15T00:19:53+5:30
वणी येथील जैन धर्मस्थानकात पर्युषण महापर्वाची सांगता करण्यात आली.
वणी : येथील जैन धर्मस्थानकात पर्युषण महापर्वाची सांगता करण्यात आली.
मलकापूर येथील बसंतीबाई संचेती व कंचन संचेती रायपूर येथून मधु रायसोनी, नाशिक येथून मीना कांकरिया अशा चार जैन धार्मिक भगिणी यांच्या उपस्थित पर्युषण महापर्वात आराधना, जप-तप, ध्यान-साधना, आशा व्रतांमध्ये जैन बांधव भगिनींसह युवक-युवती, अबालवृद्धांनी सहभाग नोंदविला. कल्पसूत्रांचे वाचन व त्याचे अर्थासहीत स्पष्टीकरण या आठ दिवसांच्या पर्वात केले जाते. अंतरंगाचा अभ्यास स्वभावातील फेरबदल, विवेकबुद्धी, अवगुणांवर नियंत्रण, मानवी जीवनासाठी आवश्यक व अनावश्यक बाबी, अशा विविध विषयांवर विवेचन करण्यात आले अध्यक्ष मूळचंद बाफना, महेंद्र बोरा, गोटु खाबिया, संजय समदडिया आदी समस्त जैन बांधव उपस्थित होते.