वन कर्मचाऱ्याने सुसाइड नोट लिहून संपवले जीवन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2022 01:12 AM2022-02-12T01:12:02+5:302022-02-12T01:12:23+5:30

अभोणा येथील वनपरिमंडळ अधिकारी कौतिक गंगाधर पाटील (५७, रा. संजयनगर) यांनी त्यांच्या राहत्या घराच्या छताच्या लोखंडी हुकला सुताच्या दोरीच्या साहाय्याने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी (दि. १०) दुपारच्या सुमारास घडली आहे. घटनास्थळी पोलिसांना सुसाइड नोट सापडली आहे.

Forest worker ended his life by writing a suicide note | वन कर्मचाऱ्याने सुसाइड नोट लिहून संपवले जीवन

वन कर्मचाऱ्याने सुसाइड नोट लिहून संपवले जीवन

Next

अभोणा : येथील वनपरिमंडळ अधिकारी कौतिक गंगाधर पाटील (५७, रा. संजयनगर) यांनी त्यांच्या राहत्या घराच्या छताच्या लोखंडी हुकला सुताच्या दोरीच्या साहाय्याने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी (दि. १०) दुपारच्या सुमारास घडली आहे. घटनास्थळी पोलिसांना सुसाइड नोट सापडली आहे.

घटनेची खबर दह्याणे येथील भगवान तारू पाटील यांनी अभोणा पोलिसात दिली. तत्काळ साहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन शिंदे यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळ गाठले. रीतसर पंचनामा करून उत्तरीय तपासणीसाठी प्रेत अभोणा ग्रामीण रुग्णालयात पाठविले. रात्री उशिरा पाटील यांच्यावर दह्याणे येथे त्यांच्या शेतात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, भाऊ, दोन मुले असा परिवार आहे.

दरम्यान, कौटुंबिक घडी सुस्थितीत, तसेच नोकरीबरोबरच सामाजिक कार्याची आवड असलेले, सेवानिवृत्तीस अवघे काही महिनेच शिल्लक असताना पाटील यांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलल्याने घटनेचे गूढ वाढले आहे. दुसरीकडे घटनास्थळी पोलिसांना आत्महत्येपूर्वी पाटील यांनी लिहून ठेवलेली सुसाईड नोट मिळाली असून त्या दिशेने तपास सुरू केला आहे.

घटनेच्या कारणाची लवकरच उकल होईल, असे साहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन शिंदे यांनी सांगितले.

 

 

Web Title: Forest worker ended his life by writing a suicide note

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.