उत्तर महाराष्टवर कायमच अन्याय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2018 12:09 AM2018-03-03T00:09:51+5:302018-03-03T00:09:51+5:30

शासनाने उत्तर महाराष्टवर कायमच अन्यायाची भूमिका ठेवली आहे. मग ते विकासकामे राहो अथवा मुख्यमंत्री पद व इतर मंत्री पदे असू द्या, उत्तर महाराष्टला कायमच उपेक्षित ठेवले असल्याचे प्रतिपादन माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी केले.

Forever injustice in North Maharashtra | उत्तर महाराष्टवर कायमच अन्याय

उत्तर महाराष्टवर कायमच अन्याय

Next

मालेगाव कॅम्प : शासनाने उत्तर महाराष्टवर कायमच अन्यायाची भूमिका ठेवली आहे. मग ते विकासकामे राहो अथवा मुख्यमंत्री पद व इतर मंत्री पदे असू द्या, उत्तर महाराष्टला कायमच उपेक्षित ठेवले असल्याचे प्रतिपादन माजी  महसूल-मंत्री एकनाथ खडसे यांनी केले. कॉँग्रेसचे नेते प्रसाद हिरे यांच्या वाढदिवसानिमित्त येथील भायगाव रस्त्यावरील तंत्रशिक्षण महाविद्यालयाच्या प्रांगणात आयोजित करण्यात आलेल्या शेतकरी मेळाव्यात खडसे बोलत होते. खडसे पुढे म्हणाले की, प्रसाद हिरे यांचे सर्व क्षेत्रातील कार्य कौतुकास्पद आहे. त्यांच्या कार्यात आपण त्यांना हवी ती मदत कर-ण्यास तयार आहोत. शेतकरी वर्गात नाराजीचा सूर आहे. आत्महत्येचे प्रमाण वाढले आहे. शासनाने ३० हजार कोटी रुपयांची कर्जमाफी देऊन २५ हजार ते दीड लाखापर्यंतचे कर्ज माफ केले तरी शेतकरी समाधानी नाही. याचा गांभीर्याने विचार करावा तर यात आपल्या उत्तर महाराष्टवर कायमच अवकृपा राहिली आहे. मोठ-मोठ्या पाणीपुरवठा योजनांसह अनेक बाबींसाठी उत्तर महाराष्टÑाला पिछाडीवर ठेवले आहे. तर यात गेल्या चार दशकांपासून महाराष्टचा मुख्यमंत्री हा एकतर मराठवाडा, विदर्भ, कोकण मुंबई या भागातुन असतो. उत्तर महाराष्टचा मुख्यमंत्री झाला की कधी असा खडसे यांनी प्रश्न यावेळी केला. तसेच या भागावर सतत अन्यायाची भावना त्यांनी व्यक्त केली. अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष उत्तम कांबळे आमदार सुधीर तांबे, कॉँग्रेस महिला प्रदेश अध्यक्षा डॉ. हेमलता पाटील, अमृता पवार, डॉ. तुषार शेवाळे यांनी मनोगत व्यक्त केले तर सर्वसामान्यांचे बापू हे श्रीकांत वाघ लिखित पुस्तकाचे प्रकाशन कार्यक्रमात करण्यात आले. कार्यक्रमास अभीष्टचिंतन सोहळा समितीचे अध्यक्ष हरिलाल अस्मर, समाधान हिरे, नगरसेवक नीलेश आहेर, जयप्रकाश पाटील, मदन गायकवाड, अ‍ॅड. ज्योती भोसले, उपमहापौर सखाराम घोडके, संजय दुसाने, नरेंद्र सोनवणे, भाजपा तालुकाध्यक्ष दीपक पवार, लकी गील, नितीन पोफळे, मधुकर हिरे, माजी आमदार अनिल आहेर आदी उपस्थित होते.  जगन्नाथ धात्रक, संजय चव्हाण, मविप्र संचालक माणिकराव बोरस्ते, देवराज गरुड, संदीप बेडसे आदिंसह शिक्षक, शेतकरी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक राजेंद्र भोसले यांनी केले. सूत्रसंचलन केवळ हिरे, अमोल निकम यांनी केले. सध्या राज्याची स्थिती चांगली नाही. त्यासाठी चांगली करण्यासाठी प्रयत्न होत आहेत पण ही परिस्थिती एवढ्या तीन वर्षांत झालेली नाही. यापूर्वीचे सरकारदेखील या परिस्थितीला जबाबदार आहे. शासनाने छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना सुरू केली तरीही शेतकरी नाराज आहे. यामध्ये शासनाचा नव्हे तर निसर्गचक्र, अवकृपा, कधी खूप पाऊस तर कधी न होणे ही कारणे तेवढीच महत्त्वाची आहेत. त्यामुळे आम्हीही सरसकट कर्जमाफी करा असा आग्रह शासनाकडे धरला आहे. - दादा भुसे, ग्रामविकास राज्यमंत्री

Web Title: Forever injustice in North Maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.