कारवाई मंदावताच मास्कचा पडला विसर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2021 04:17 AM2021-09-06T04:17:28+5:302021-09-06T04:17:28+5:30
जिल्हा प्रशासनाने कोरोना नियम शिथिल केल्यामुळे शहरासह पंचवटी परिसरात कोरोना नियम उघडपणे पायदळी तुडविले जात असल्याचे चित्र स्पष्ट दिसत ...
जिल्हा प्रशासनाने कोरोना नियम शिथिल केल्यामुळे शहरासह पंचवटी परिसरात कोरोना नियम उघडपणे पायदळी तुडविले जात असल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे. विशेष म्हणजे प्रशासनानेदेखील नियमांचे उल्लंघन करणाऱ्या बेशिस्त नागरिक आणि आस्थापना चालकांवर कारवाई करण्यासाठी हात आखडता घेतल्याने त्यात भर पडू लागली आहे. पंचवटी परिसरातील मिठाई, कपडे, फळविक्री, चहा स्टॉल, खाद्यपदार्थ विक्री, हॉटेल, रस्त्यावर भरणारा भाजीबाजार, कृषी उत्पन्न बाजार समिती वा पेट्रोल पंप असो या गर्दीच्या ठिकाणी तोंडावर मास्क लावून फिजिकल डिस्टन्सिंग पालन गरजेचे असले तरी अनेक नागरिकांनी शासनाच्या या नियमाला केराची टोपली दाखविली आहे. नागरिक रिक्षात, तसेच महापालिकेच्या बसमध्ये, तसेच पायी फिरताना मास्क वापरत नसल्याचे दिसून येत असल्याने कोरोना संपला की काय असे वाटू लागले आहे.