पावसाळापूर्व कामाचे विसर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2021 04:13 AM2021-05-24T04:13:46+5:302021-05-24T04:13:46+5:30
राजीवनगर झोपडपट्टी ते जॉगिंग ट्रॅकपर्यंत नैसर्गिक पावसाळी नाला आहे. दरवर्षी नाल्यातून पावसाचे पाणी दुतर्फा वाहून नागरिकांच्या घरात शिरते. ...
राजीवनगर झोपडपट्टी ते जॉगिंग ट्रॅकपर्यंत नैसर्गिक पावसाळी नाला आहे. दरवर्षी नाल्यातून पावसाचे पाणी दुतर्फा वाहून नागरिकांच्या घरात शिरते. राजीवनगर झोपडपट्टी ते जॉगिंग ट्रॅकपर्यंत सिमेंट काँक्रीटचा पावसाळी नाला तयार करण्यात आला असून, सदर पावसाळी नाला विविध सोसायट्या व कॉलनी यांच्या मधून गेला आहे. झोपडपट्टीलगत असलेल्या भूमिगत गटारीच्या चेंबरमधून काही सोसायट्यांचे सांडपाणी पावसाळी नाल्यात सोडण्यात आले आहे. अरुणोदय सोसायटी ते मानस कॉलनीदरम्यान व गजानन मंदिर ते जॉगिंग ट्रॅकपर्यंत पावसाळी नाला बंदिस्त न केल्यामुळे परिसरात घाण व दुर्गंधीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. त्यामुळे नागरिकांना घराची दारे, खिडक्यासुद्धा उघडता येत नाहीत. काही नागरिक या नाल्यात केर कचरा टाकत असल्याने कचराकुंडीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. पावसाळा सुरू होण्यास अवघे दहा दिवस असतानाही महापालिकेच्या संबंधित विभागाने पावसाळापूर्व नाल्यांची अद्याप स्वच्छता मोहीम राबवली नाही.