चार टन उसापासून साकारले गणरायाचे रूप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2018 12:24 AM2018-09-20T00:24:53+5:302018-09-20T00:25:10+5:30
दरवर्षीप्रमाणे यंदाही धार्मिक, पौराणिक पुण्यनगरी-कुंभनगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शहरात पहावयास मिळत आहे. शहरातील पंचवटी हा परिसर प्रभू रामचंद्रांचा वनवासकाळात महत्त्वाचा राहिला आहे.
नाशिक : दरवर्षीप्रमाणे यंदाही धार्मिक, पौराणिक पुण्यनगरी-कुंभनगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शहरात पहावयास मिळत आहे. शहरातील पंचवटी हा परिसर प्रभू रामचंद्रांचा वनवासकाळात महत्त्वाचा राहिला आहे. पंचवटी मधील पाथरवट लेन येथील लक्ष्मीछाया मित्रमंडळाने सालाबादप्रमाणे यावर्षीही ‘युनिक-इको फ्रेण्डली’ गणेशोत्सवाची परंपरा कायम राखली आहे. मंडळाच्या युवा कार्यकर्त्यांनी सुमारे चार टन उसाचा वापर करून लाडक्या बाप्पांचे आकर्षक रूप साकारले आहे. उसापासूनच यावर्षी गणरायांची मूर्ती साकारायची आणि बळीराजाचे महत्त्व पुन्हा समाजापुढे अधोरेखित करायचे या उद्देशाने इको फ्रेण्डली संकल्पनेतून या मंडळाच्या कार्यकर्त्यांनी उसाचा वापर करत ‘श्रीं’चे रूप साकारले. ‘जरा हटके’ आगळीवेगळी संकल्पना व तीदेखील पर्यावरणपूरकच असेल याचा वर्षभर विचार करत त्या संकल्पनेतून या मंडळाचे कार्यकर्ते गेल्या २००४ सालापासून दरवर्षी सार्वजनिक गणेशोत्सवात सहभागी होत असतात. त्यांच्या या आगळ्यावेगळ्या प्रयोगाला विविध संस्था, संघटनांकडून बक्षिसेही मिळाली आहेत.
एकूणच गणेशोत्सवात शहरातील मुख्य आकर्षण पंचवटी भागातील या मंडळाचा गणपती असतो. मागील वर्षी या मंडळाने चक्क पाच हजार चिंचोक्यांपासून गणरायांची सुबक मूर्ती साकारली होती. मंडळाचे अनुप महाजन, रोशन झेंडे, अक्षय झेंडे, अभिजीत वाघ, हरी घोडके, अविनाश वानखेडकर आदी कार्यकर्ते असा आगळावेगळा गणेशोत्सव साजरा करण्यासाठी प्रयत्नशील असतात.
वर्षनिहाय साकारलेली गणेशाची रूपे
२००४ : रुद्राक्ष गणेश
२००५ : गुळाचा गणपती
/>२००६ : हिºयांचा गणपती
२००७ : पुष्प गणेश
२००८ : मोत्यांचा गणपती
२००९ : चॉकलेट गणेश
२०१० : पूजा साहित्यापासून
२०११ : गिफ्ट बॉक्सपासून
२०१२ : रेशिमबॉलपासून
२०१३ : चमकीच्या माळांचा गणपती
२०१४ : काचेचा गणपती
२०१५ : कुंदन गणेश
२०१६ : कामट्यांपासून बनविला गणपती
२०१७ : चिंचोक्यामधून साकारले गणराय