इंग्रजांमुळे रुजली औपचारिक शिक्षण पद्धती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2019 01:35 AM2019-03-16T01:35:40+5:302019-03-16T01:36:06+5:30
भारतात कित्येक वर्षे गुरुकुल शिक्षण पद्धती अस्तित्वात होती, परंतु इंग्रज राज्यकर्त्यांनी देशातील शिक्षण पद्धतीत मूलभूत बदल करून येथे औपचारिक शिक्षण पद्धतीला चालना दिली. त्यामुळेच देशात सध्याची औपचारिक शिक्षण पद्धती रुजली असून, त्यापुढील काळात कालांतराने त्यांनी भारतीयांना दिलेल्या औपचारिक शिक्षण पद्धतीमुळेच पुढे या देशात वाचन संस्कृती खऱ्या अर्थाने रुजली, असे प्रतिपादन मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील यांनी केले.
नाशिक : भारतात कित्येक वर्षे गुरुकुल शिक्षण पद्धती अस्तित्वात होती, परंतु इंग्रज राज्यकर्त्यांनी देशातील शिक्षण पद्धतीत मूलभूत बदल करून येथे औपचारिक शिक्षण पद्धतीला चालना दिली. त्यामुळेच देशात सध्याची औपचारिक शिक्षण पद्धती रुजली असून, त्यापुढील काळात कालांतराने त्यांनी भारतीयांना दिलेल्या औपचारिक शिक्षण पद्धतीमुळेच पुढे या देशात वाचन संस्कृती खऱ्या अर्थाने रुजली, असे प्रतिपादन मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील यांनी केले.
मु. शं. औरंगाबादकर सभागृहात सार्वजनिक वाचनालयाच्या १७९व्या वार्षिक समारंभाला शुक्रवारी (दि.१५) वाङ््मयीन पुरस्कार वितरण सोहळ्याने प्रारंभ झाला.
व्यासपीठावर सावानाचे अध्यक्ष प्राचार्य विलास औरंगाबादकर, प्रमुख कार्यवाह श्रीकांत बेणी, क वी किशोर पाठक, नानासाहेब बोरस्ते आदींसह पुरस्कारार्थी उपस्थित होते. ठाले पाटील पुढे म्हणाले, भारतीय इतिहासात गुरुकुलात किंवा आश्रमात पठण पद्धत होती. देशात वाचन संस्कृती ही खऱ्या अर्थाने इंग्रजांच्या शिक्षण पद्धतीमुळे रुजली असून, ग्रंथालये असावीत, अशी विचारधारा आगरकर, टिळक आदींनी आपल्या देशात रुजविल्याचेही ते म्हणाले.
सार्वजनिक वाचनालय हे राज्यातील पहिले व देशातील दुसरे जुने वाचनालय असल्याचे गौरवोद्गारही त्यांनी काढले.
अॅड. अभिजित बगदे यांनी प्रास्ताविक केले. प्रा. शंकर बोºहाडे यांनी सूत्रसंचालन केले. गिरीश नातू यांनी आभार मानले.
कवी विवेक उगलमुगले, प्रा. भास्कर ढोके, डॉ. सुनील कुटे, प्रकाश वैद्य, प्रा. अनंत येवलेकर व
प्राचार्य दिलीप धोंडगे यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. त्यांचाही
गौरव अध्यक्षांच्या हस्ते करण्यात आला.
सावानातर्फे लेखक रविराज गंधे यांना डॉ. वि. म. गोगटे (ललितेत्तर ग्रंथ) पुरस्काराने, तर दिनकर कुटे यांना डॉ. अ. वा. वर्टी (कथालेखन) पुरस्कार, डॉ. यशवंत पाटील यांना मु. ब. यंदे (सामाजिक, प्रवास ग्रंथ) पुरस्कार, किरण येले यांना पु. ना. पंडित (लघुकथासंग्रह) पुरस्कार, अभिजित कुलकर्णी यांना धनंजय कुलकर्णी (कादंबरी) पुरस्कार, प्रा. गो. तु. पाटील यांना अशोक देवदत्त टिळक (आत्मचरित्र ) पुरस्कार व हेरंब कुलकर्णी यांना ग. वि. अकोलकर शैक्षणिक, प्रवास ग्रंथ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.