जिल्ह्यातील ६ नगरपंचायत प्रभाग रचना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2020 06:26 PM2020-10-12T18:26:00+5:302020-10-12T18:26:22+5:30
कळवण : नोव्हेंबर व डिसेंबर २०२० मध्ये मुदत संपुष्टात येणाऱ्या कळवण देवळा, निफाड, पेठ, सुरगाणा नगरपंचायतसह चांदवड नगरपरिषदचे प्रभाग रचना, आरक्षण व सोडतीचा कार्यक्र म राज्य निवडणूक आयोगाकडून घोषित करण्यात आला आहे. त्यामुळे जिल्ह्यात नगरपंचायत व नगरपरिषद निवडणुकीचे पडघम वाजणार असून डिसेंबर महिन्यात निवडणूक कार्यक्र म घोषित होण्याची शक्यता आहे.
कळवण : नोव्हेंबर व डिसेंबर २०२० मध्ये मुदत संपुष्टात येणाऱ्या कळवण देवळा, निफाड, पेठ, सुरगाणा नगरपंचायतसह चांदवड नगरपरिषदचे प्रभाग रचना, आरक्षण व सोडतीचा कार्यक्र म राज्य निवडणूक आयोगाकडून घोषित करण्यात आला आहे. त्यामुळे जिल्ह्यात नगरपंचायत व नगरपरिषद निवडणुकीचे पडघम वाजणार असून डिसेंबर महिन्यात निवडणूक कार्यक्र म घोषित होण्याची शक्यता आहे.
नगरपंचायत, नगरपरिषद प्रारु प प्रभाग रचनेच्या प्रस्तावास मान्यता, सदस्यपदांच्या आरक्षणाच्या सोडतीकरीता नोटीस प्रसिध्द, सदस्यपदांच्या आरक्षणाची सोडत, प्रारु प प्रभाग रचना, प्रभागदर्शक नकाशे व सदस्य पदांच्या आरक्षणाची अधिसूचना आदी कार्यक्र महाराष्टÑ राज्य निवडणूक आयोगाने घोषित केला आहे.
२१ आॅक्टोबर रोजी प्रारु प प्रभाग रचनेचा प्रस्ताव नगर परिषद, नगरपंचायतीच्या प्रभागांची संख्या, त्यांची प्रभागनिहाय एकूण व अनुसूचित जाती तसेच अनुसूचित जमातीची २०११ च्या जनगणनेनुसार लोकसंख्या, क्षेत्र, सीमांकन, नकाशा, अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती आरक्षण यासह मुख्याधिकारी हे जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर करणार आहे.
२९ आॅक्टोबर रोजी जिल्हाधिकारी हे नगरपंचायत प्रारु प प्रभाग रचनेच्या प्रस्तावास मान्यता देणार आहे.
३ आॅक्टोबर रोजी जिल्हाधिकारी व नगरपंचायतकडून सदस्यपदांच्या आरक्षणाच्या सोडतीकरिता नोटीस प्रसिध्द करण्यात येणार आहे.
१० नोव्हेंबर रोजी नगरपरिषद, नगरपंचायतीच्या सदस्यपदांच्या आरक्षणाची सोडत काढण्यात येणार असून अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीमधील महिला, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग व त्यामधील महिला तसेच सर्वसाधारण प्रवर्गातील महिला यांचा समावेश असणार आहे.
१८ आॅक्टोबर रोजी जिल्हाधिकारी यांच्याकडे प्रारु प प्रभाग रचना, प्रभागदर्शक नकाशे व सदस्य पदांच्या आरक्षणाची नागरिकांच्या रिहवाश्यांच्या माहितीसाठी व हरकती तसेच सूचना मागविणेकरिता वत्तपत्रात व स्थानिकपातळीवर तसेच जिल्हाधिकारी कार्यालय व नगर परिषद, नगरपंचायतीच्या वेबसाईटवर प्रसिध्द करण्यात येणार आहे
१८ आॅक्टोबर ते २६ आॅक्टोबर पर्यंत हरकती व सूचना मागविण्यात येणार असून ४ डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात प्राप्त हरकती व सूचनांवर सुनावणी होणार आहे.
हरकती व सूचनांच्या अनुषंगाने अभिप्राय देऊन जिल्हाधिकारी १० डिसेंबर रोजी विभागीय आयुक्त तथा प्रादेशिक संचालक , नगरपरिषद प्रशासन यांच्याकडे अहवाल पाठविणार असून १७ डिसेंबर रोजी विभागीय आयुक्त हे अंतिम प्रभाग रचनेस मान्यता देणार आहे.