माजी नगराध्यक्षांमध्ये लढत

By admin | Published: November 15, 2016 12:45 AM2016-11-15T00:45:38+5:302016-11-15T01:02:51+5:30

माजी नगराध्यक्षांमध्ये लढत

Former Chief Election Commissioner | माजी नगराध्यक्षांमध्ये लढत

माजी नगराध्यक्षांमध्ये लढत

Next

विलास भालेराव  भगूर
येथील प्रभाग २ ब हा जनरल असून, येथे दोन प्रबळ माझी नगराध्यक्ष आणि समजाचे नेते असल्याने तिरंगी जरी असली, तरी खरी लढत दोन माजी नगराध्यक्षांमध्ये होण्याची शक्यता असून, तिसरा कोणाची मते खाणार यावर दोघांचे भवितव्य अवलंबून आहे.
प्रभाग २ ब मध्ये जलशुद्धीकरण केंद्र, सुकापूरपेठ व श्रीकृष्णवाडा परिसर येतो. मतदार संख्या १४८१ असून, येथे मराठा, दलित मतदार जास्त आहेत. येथून शिवसेनेतर्फे विजय करंजकर, आघाडीकडून भारती साळवे व भाजपाचे प्रसाद आडके नशीब आजमावत आहेत. यातील विजय करंजकर हे विद्यमान नगरसेवक असून, दोन वेळेस भगूरचे नगराध्यक्ष होऊन गेले आहेत. शिवाय शिवसेनेचे जिल्हाप्रमुख असल्याने मराठा मतदारांवर त्यांची चांगली पकड आहे. त्यांनी गावची विकासकामे केली असून, ते प्रबोधन मित्रमंडळाचे संस्थापक अध्यक्ष आहेत. राजकीय नियोजन आणि उत्कृष्ट वक्तृत्व असल्याने त्यांना मानणारा मतदार असून, त्यांच्या पत्नी विद्यमान नगराध्यक्ष होत्या.
भारती साळवे या विद्यमान नगरसेवक असून, त्यांनी दोन वेळेस नगराध्यक्षपद भूषविले आहे. शिवाय रिपब्लिकन पक्ष आणि दलित समाजाच्या प्रमुख नेत्या असल्याने दलित बहुजन मतदारांवर त्यांची चांगलीच पकड आहे. त्यांनीही गावची विकासकामे केली असून, त्या माता रमाई आंबेडकर महिला मंडळाच्या संस्थापक अध्यक्ष आहेत. राजकीय नियोजन आणि चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करणाऱ्या भारती साळवे या प्रभागातील रहिवासी असून, त्या प्रभाग ८ मध्ये राहतात. तरीही मागील निवडणुकीत प्रभाग १ मधून निवडून आल्या होत्या. आताही त्या प्रभाग-२ मधून लढत आहेत. दलित मतदारांवर त्यांची विशेष मदार आहे. आघाडीकडून त्या पंजा चिन्हावर लढत आहेत. प्रसाद आडके हा मराठा समाजाचा नवयुवक आहे. माजी नगरसेवक मीना आडके या त्यांच्या आई. वडील अंबादास आडके सहकारी संस्थांचे हुशार व्यक्तिमत्त्व आणि ३० वर्षांपासून संचालक पदाधिकारी असा राजकीय वारसा प्रसाद आडकेला असून, हा समाजसेवक उच्चशिक्षित आहे.

 

Web Title: Former Chief Election Commissioner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.