उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या आभार दौऱ्यात उद्धवसेनेच्या माजी नगरसेवकांचा शिंदेसेनेत प्रवेश?

By संजय पाठक | Updated: February 8, 2025 18:25 IST2025-02-08T18:24:16+5:302025-02-08T18:25:14+5:30

महायुतीला पुन्हा सत्तेत आणल्याबद्दल शिंदे यांचा १३ फेब्रुवारीला नाशिकमध्ये आभार दौरा

Former corporators of Uddhav Thackeray group may join Eknath Shinde Shiv Sena party during Dy CM visit | उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या आभार दौऱ्यात उद्धवसेनेच्या माजी नगरसेवकांचा शिंदेसेनेत प्रवेश?

उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या आभार दौऱ्यात उद्धवसेनेच्या माजी नगरसेवकांचा शिंदेसेनेत प्रवेश?

संजय पाठक, नाशिक: राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे येत्या १३ फेब्रुवारी रोजी नाशिकच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या या आभार दौऱ्यात उद्धवसेनेचे काही माजी नगरसेवक शिंदेसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे.

विधानसभा निवडणुकीनंतर राजकीय कल बदल असून उद्धवसेनेतील अनेक माजी नगरसेवक शिंदे सेनेच्या संपर्कात आहेत. उद्धवसेनेबरोबरच काही अन्य पक्षाच्या माजी नगरसेवकांचाही प्रवेश सोहळा पार पडला असला तरी काही माजी नगरसेवक हे नाशिकमध्ये प्रवेश करण्याच्या मानसिकतेत आहेत. त्यामुळे येत्या १३ फेब्रुवारी रोजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नाशिक दौऱ्यात हा प्रवेश सोहळा होण्याची शक्यता पक्षाच्या सूत्रांनी वर्तवली आहे.

राज्यात महायुतीची सत्ता आल्याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिक मध्ये आभार मानण्यासाठी येणार आहेत. यादरम्यान त्यांच्या सभाही होणार आहेत.

Web Title: Former corporators of Uddhav Thackeray group may join Eknath Shinde Shiv Sena party during Dy CM visit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.