भाजपाला धक्का, मनसेतून आलेले माजी जिल्हा प्रमुख सुदाम कोंबडे उद्या स्वगृही परतणार
By संजय पाठक | Published: May 1, 2023 07:48 PM2023-05-01T19:48:53+5:302023-05-01T19:49:07+5:30
सध्या माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गटातील पदाधिकारी आणि माजी नगरसेवक शिवसेना शिंदे गटात जाण्याची स्पर्धा सुरू असताना नाशिक भाजपाला मात्र धक्का बसला आहे.
नाशिक : सध्या माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गटातील पदाधिकारी आणि माजी नगरसेवक शिवसेना शिंदे गटात जाण्याची स्पर्धा सुरू असताना नाशिकभाजपाला मात्र धक्का बसला आहे. या पक्षातील माजी नगरसेवक आणि मनसेचे माजी जिल्हाध्यक्ष सुदाम कोंबडे हे पुन्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये प्रवेश करणार आहेत मंगळवारी सकाळी अकरा वाजता शिवतीर्थावर हा प्रवेश सोहळा होणार आहे. सुदाम कोंबडे यांच्या समवेत अन्य पदाधिकारी- कार्यकर्ते देखील मनसेत प्रवेश करणार आहेत.
2012 ते 2017 दरम्यान नाशिक महापालिकेत मनसेची सत्ता होती या दरम्यान सुदाम कोंबडे हे मनसेचे नगरसेवक होते त्यांना राज ठाकरे यांनी जिल्हाप्रमुख म्हणून नियुक्त केले होते. महापालिकेत अत्यंत धडाडीचे काम करणाऱ्या कोंबडे यांनी काही कारणामुळे राजीनामा दिला होता त्यानंतर 2017 मध्ये त्यांनी भाजपा कडून महापालिकेची निवडणूक लढवली होती तर त्यांचा पराभव झाला होता आता मनसे नाशिक मध्ये पुन्हा नव्याने उभारी घेत असताना सुदाम कोंबडे यांच्यासह अन्य पदाधिकारी स्वगृही प्रवेश करीत पक्षात पुन्हा उत्साहाचे वातावरण आहे.