इगतपुरीचे माजी आमदार विठ्ठलराव घारे यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2019 12:28 AM2019-01-04T00:28:36+5:302019-01-04T00:29:32+5:30

घोटी : दोनदा विधानसभेत इगतपुरीचे प्रतिनिधित्व केलेले माजी आमदार विठ्ठलराव गणपत घारे (८५) यांचे बुधवारी रात्री २ वाजता काळुस्ते येथे वृद्धापकाळाने निधन झाले.

Former Igatpuri MLA Vitthalrao Ghare passed away | इगतपुरीचे माजी आमदार विठ्ठलराव घारे यांचे निधन

विठ्ठलराव घारे

googlenewsNext
ठळक मुद्दे दुर्गम आदिवासी भागाला विकास प्रवाहात आणण्यासाठी त्यांनी दिलेले योगदान आजही स्मरणात

घोटी : दोनदा विधानसभेत इगतपुरीचे प्रतिनिधित्व केलेले माजी आमदार विठ्ठलराव गणपत घारे (८५) यांचे बुधवारी रात्री २ वाजता काळुस्ते येथे वृद्धापकाळाने निधन झाले.
काँग्रेसच्या तिकिटावर १९७२मध्ये २३०६० मते तर १९८० मध्ये १७३८९ मते मिळवून त्यांनी विजय संपादन केला होता. आमदार म्हणून दोन वेळा विधानसभेवर गेल्यावर विविध समित्या, ग्रंथालय चळवळ, भाताला हमीभाव, बांधकाम, पाटबंधारे आदी विषयांवर लढा दिला. १९८५च्या निवडणुकीत ते दुसऱ्या क्रमांकावर होते. दोनवेळा विधानसभेचे प्रतिनिधित्व करूनही त्यांची राहणी अत्यंत साधी होती. शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी आपल्या राहत्या गावी शेती करता करता ग्रामस्थांना जाणकार करण्याचे काम केले. (पान ७ वर)
विधानसभेत इगतपुरीचे प्रश्न त्यांनी मांडले. काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस दिवंगत गोपाळराव गुळवे यांच्या खांद्याला खांदा लावून त्यांनी काम केले. त्यांच्या कार्यकाळात शेतकºयांच्या प्रश्नावर त्यांनी सातत्याने आवाज उठवला होता. काळुस्ते सारख्या दुर्गम आदिवासी भागाला विकास प्रवाहात आणण्यासाठी त्यांनी दिलेले योगदान आजही स्मरणात आहे.
निधनाचे वृत्त कळताच सकाळपासूनच काळुस्ते येथील त्यांच्या निवासस्थानी चाहत्यांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. त्यांच्यावर दुपारी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी तालुक्यातील विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
इगतपुरी तालुक्यातील सर्व राजकीय पक्षाच्या पदाधिकाºयांनी घारे यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केले आहे. आमदार निर्मला गावित यांनी शोकसंदेशात म्हटले की, इगतपुरी तालुक्याला सर्वमान्य खंबीर नेतृत्व देणाºया विठ्ठलराव घारे यांच्या निधनाने मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

Web Title: Former Igatpuri MLA Vitthalrao Ghare passed away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Deathमृत्यू