माजी मंत्री खडसेंची ‘एसीबी’कडून चौकशी, एकनाथ खडसेंकडून इन्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2017 04:29 AM2017-09-21T04:29:11+5:302017-09-21T04:29:14+5:30
माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या पुण्यातील भोसरी येथील जमीन खरेदीप्रकरणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी नव्याने केलेल्या आरोपांची चौकशी लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने सुरू केली आहे. खडसे यांनी बुधवारी दुपारी येथील एसीबी कार्यालयात हजेरी लावली.
नाशिक : माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या पुण्यातील भोसरी येथील जमीन खरेदीप्रकरणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी नव्याने केलेल्या आरोपांची चौकशी लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने सुरू केली आहे. खडसे यांनी बुधवारी दुपारी येथील एसीबी कार्यालयात हजेरी लावली.
सुमारे दोन तास खडसे यांची चौकशी करण्यात आली असली तरी, अधिकाºयांनी त्याबाबत काहीही माहिती दिली नाही. चौकशी आटोपून परतणाºया खडसोंना माहिती विचारण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनी काहीही बोलण्यास नकार दिला. ‘छापा, छापा मोठा फोटो छापा’ असे पत्रकारांना उद्देशून आपली उद्विनता व्यक्त केल्याने एसीबीने चौकशीत बरेच प्रश्न खडसेंना विचारले असावेत, असा अर्थ काढला जात आहे.
नाशिक अॅन्टी करप्शन ब्युरो कार्यालयात चौकशीसाठी गेल्याचा खडसे यांनी इन्कार केला आहे. कार्यालयात आपण गेलो होतो. मात्र आपली कोणतीही चौकशी येथे नव्हती तर कागदपत्रे घेण्यासाठी गेल्याचे त्यांनी सांगितले.