माजी मंत्री खडसेंची लाचलुचपतकडून चौकशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2017 11:57 PM2017-09-20T23:57:16+5:302017-09-20T23:57:23+5:30
माहिती देण्यास नकार : प्रसिद्धिमाध्यमांवर राग नाशिक : माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या पुण्यातील भोसरी येथील जमीनप्रकरणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी नव्याने केलेल्या आरोपांची चौकशी लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने सुरू केली असून, यासंदर्भात खडसे यांनी बुधवारी दुपारी नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या कार्यालयात हजेरी लावली. सुमारे दोन तास खडसे यांची चौकशी करण्यात आली असली तरी, लाचलुचपतच्या अधिकाºयांनी कानावर हात ठेवल्याने यासंदर्भातील गूढ वाढले आहे.
माहिती देण्यास नकार : प्रसिद्धिमाध्यमांवर राग
नाशिक : माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या पुण्यातील भोसरी येथील जमीनप्रकरणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी नव्याने केलेल्या आरोपांची चौकशी लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने सुरू केली असून, यासंदर्भात खडसे यांनी बुधवारी दुपारी नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या कार्यालयात हजेरी लावली. सुमारे दोन तास खडसे यांची चौकशी करण्यात आली असली तरी, लाचलुचपतच्या अधिकाºयांनी कानावर हात ठेवल्याने यासंदर्भातील गूढ वाढले आहे.
दरम्यान, चौकशी आटोपून परतणाºया खडसे यांना प्रसिद्धिमाध्यमांनी माहिती विचारण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी बोलण्यास नकार दिला. मात्र, ‘छापा, छापा मोठा फोटो छापा’ असे पत्रकारांना उद्देशून आपली उद्गिनता व्यक्त केल्याने लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने चौकशीत बरेच उलटसुलट प्रश्न खडसेंना विचारले असावेत, असा अर्थ काढला जात आहे.
माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांचे भोसरी येथील एमआयडीसी जमीन खरेदी प्रकरण सध्या गाजत असून, प्रारंभी या जमिनी खरेदीची आपणास काहीच माहिती नसल्याचे सांगणाºया खडसे यांनी चौकशी आयोगासमोर त्याची कबुली दिली. परंतु जमीन व्यवहाराचे पैसे आपण दिले नसल्याचा पवित्रा घेतला होता. त्यासंदर्भात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी अलीकडेच प्रसिद्धीमाध्यमांसमोर खडसेंच्या बॅँक व्यवहारांची माहिती जाहीर करून याबाबत न्यायालयातही तक्रार केली होती. न्यायालयाने खडसेंविरुद्ध चौकशी करणाºया लाचलुचपत प्रतिबंधक विभागावर ताशेरेही ओढले होते. या सर्व पार्श्वभूमीवर बुधवारी दुपारी दोन वाजता खडसे यांनी पोलीस बंदोबस्तात नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या कार्यालयात हजेरी लावली. सुमारे दोन ते अडीच तास खडसे या कार्यालयात हजर होते. यावेळी मात्र पत्रकार तसेच अभ्यागतांना कार्यालयात प्रवेश नाकारण्यात आला. चार वाजेनंतर खडसे चौकशी आटोपून निघून गेले. परंतु त्यांची नेमकी कोणत्या विषयावर चौकशी करण्यात आली याचा उलगडा होऊ शकला नाही.
लाचलुचपतचे सोयीस्कर मौन
एरव्ही दोनशे रुपये लाच घेणाºयाला पकडल्यानंतर प्रसिद्धीमाध्यमांना प्रेस नोट पाठवून आपली पाठ थोपटून घेण्यात धन्यता मानणाºया लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्याबाबत मात्र सोयीस्कर मौन पाळले. प्रसिद्धीमाध्यमांनी विचारणा केल्यावर ‘नो कॉमेंट्स’ एवढेच उत्तर देण्यात आले. त्यामुळे लाचलुचपत खाते कोणाच्या तरी दबावाखाली काम करीत असल्याची चर्चा होऊ लागली आहे.
खडसेंची उद्विग्नताएकनाथ खडसे दुपारी २ वाजता पोलिसांच्या ताफ्यातच एसीबीच्या कार्यालयात हजर झाले. खडसे स्वत:हून हजर झाल्याचे वृत्त पसरताच, त्यांच्या समर्थकांनीही कार्यालयाच्या बाहेर गर्दी केली होती. चौकशी आटोपून खडसे निघाल्यावर प्रसिद्धिमाध्यमांनी त्यांना माहिती विचारण्याचा प्रयत्न केला तर काहींनी त्यांची छबी टिपली. त्यावर त्रासून खडसे यांनी प्रसिद्धिमाध्यमांवरच राग काढत ‘छापा, छापा, माझा मोठा फोटो छापा’ असे सांगून त्यांनी त्रागा केला.