माजी आमदार मौलाना मुफ्ती यांचा एमआयएममध्ये प्रवेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2019 12:28 AM2019-08-30T00:28:50+5:302019-08-30T00:29:45+5:30

मालेगाव मध्य : राष्टÑवादी कॉँग्रेसचे मालेगाव मध्य मतदार संघातील माजी आमदार मौलाना मुफ्ती मोह्ममद इस्माईल यांनी गुरुवारी रात्री आपल्या समर्थकांसह एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष व खासदार इम्तियाज जलील यांच्या उपस्थितीत एमआयएम पक्षात प्रवेश घेतला.

Former MLA Maulana Mufti joins MIM | माजी आमदार मौलाना मुफ्ती यांचा एमआयएममध्ये प्रवेश

मालेगाव येथील सभेत बोलताना खासदार इम्तियाज जलील. व्यासपीठावर डॉ खालीद परवेझ, जिल्हाध्यक्ष अब्दुल मलीक शेख, औरंगाबाद मनपाचे विरोधी पक्षनेते अरु ण बोर्डे, नासिर सिद्दीकी माजी महापौर मलिक शेख , युनूस इसा आदी.

Next
ठळक मुद्देइम्तियाज जलील हे गुरुवारी सायंकाळी मालेगावात दाखल झाले होते.

मालेगाव मध्य : राष्टÑवादी कॉँग्रेसचे मालेगाव मध्य मतदार संघातील माजी आमदार मौलाना मुफ्ती मोह्ममद इस्माईल यांनी गुरुवारी रात्री आपल्या समर्थकांसह एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष व खासदार इम्तियाज जलील यांच्या उपस्थितीत एमआयएम पक्षात प्रवेश घेतला.
गेल्या काही दिवसांपासून मौलाना मुफ्ती हे एमआयएमच्या संपर्कात होते. बकरी ईदनंतर ते हज यात्रेसाठी गेल्याने त्यांचा पक्षप्रवेश रखडला होता. दोन दिवसांपूर्वीच ते हजयात्रेहून परतताच त्यांनी तातडीने खासदार इम्तियाज जलील यांच्या उपस्थितीत एमआयएममध्ये प्रवेश घेतला. खासदार इम्तियाज जलील हे गुरुवारी सायंकाळी मालेगावात दाखल झाले होते. रात्री उशीरा मुशावरत चौकात झालेल्या सभेत मौलाना यांचा पक्षप्रवेश झाला. प्रथम जनसुराज्य पक्ष, नंतर राष्टÑवादी आणि आता एमआयएम असा मौलाना यांचा प्रवास आहे.
मौलाना यांच्या प्रवेशाने मालेगाव मध्य मतदारसंघातील कॉँग्रेसचे आमदार आसिफ शेख यांच्याशी काट्याची लढत रंगण्याचे आता स्पष्ट झाले आहे.
या नव्या राजकीय समीकरणांमुळे मतदार संघातील वंचित आघाडी व मोमीन मतदार यांच्या बळावर निवडणूकीत चुरस पहावयास मिळणार आहे. दरम्यान, मालेगाव मध्य मतदारसंघात खरी लढत दुरंगी होते की तिरंगी याकडे मतदारांचे लक्ष लागून आहे.देशात तीन तलाक, आसाममध्ये एनआरसीचा मुद्दा, व काश्मिरमधून कलम ३७० हटविण्याचा घेतलेला निर्णय यावरु नच देशात लोकशाही संपुष्टात आली असून देश हुकुमशाहीकडे वाटचाल करीत असल्याचे जाणवत आहे. या विरोधात बोलणाऱ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे. राजकीय लाभ उचलण्यासाठी विभिन्न प्रकारे पक्षाला टिकेचे लक्ष्य करणारेच आज भाजपाच्या तंबूत सामील झाले आहेत. एमआयएममुळे राज्याचे राजकीय समीकरणे बदलणार असल्याने सर्व धर्मियांनी पक्षाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे. - इम्तियाज जलील, खासदार

Web Title: Former MLA Maulana Mufti joins MIM

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.