टोलनाक्यावर चक्क हटकले माजी आमदाराला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2018 17:49 IST2018-09-24T17:48:46+5:302018-09-24T17:49:39+5:30

पिंपळगाव बसवंत : येथील पीएनजी टोलनाका कायमच कोणत्यान कोणत्या वादाने चर्चेत राहिला आहे. त्याचा प्रत्यय पुन्हा एकदा दिसून आला. बागलाण तालुक्याचे माजी आमदार तसेच विद्यमान आमदार दिपिका चव्हाण यांचे पती संजय चव्हाण यांना सोमवारी (दि.२४) त्याचा प्रत्यय आला आहे.

Former MLA from Tolaanak | टोलनाक्यावर चक्क हटकले माजी आमदाराला

टोलनाक्यावर चक्क हटकले माजी आमदाराला

ठळक मुद्दे ओळखपत्रावरील फोटो व प्रत्यक्षात तुमचा चेहरा जुळत नसल्याचे कारण

पिंपळगाव बसवंत : येथील पीएनजी टोलनाका कायमच कोणत्यान कोणत्या वादाने चर्चेत राहिला आहे. त्याचा प्रत्यय पुन्हा एकदा दिसून आला. बागलाण तालुक्याचे माजी आमदार तसेच विद्यमान आमदार दिपिका चव्हाण यांचे पती संजय चव्हाण यांना सोमवारी (दि.२४) त्याचा प्रत्यय आला आहे.
चव्हाण हे बागलाणहून पिंपळगाव बसवंत मार्गी नाशिककडे जात असतांना त्यांचे वाहन पीएनजी टोल नाक्यावर आले असता त्यांनी आपले ओळखपत्र टोलप्लाझावरील महिला कर्मचाऱ्यांना दाखविले असता ओळखपत्रावरील फोटो व प्रत्यक्षात तुमचा चेहरा जुळत नसल्याचे कारण देत तुम्हाला टोल भरावाच लागेल. असा सज्जड दमच चव्हाण यांना देण्यात आला.
त्यांनी आपले माजी आमदार असलेले ओळखपत्र तसेच इतरही ओळखपत्र त्या कर्मचाºयांना दाखवले पण सदर कर्मचारी ऐकण्यास तयार नव्हती. आपण लोकप्रतिनिधी असल्याचे वारंवार सांगूनही सदर कर्मचारी ऐकत नसल्याचे पाहून चव्हाण यांनी टोल व्यवस्थापक चौधरी यांना बुथवर बोलावले. त्यांना सर्व प्रकार सांगितला व टोल प्लाझावरील तक्र ार नोंदवहीत रीतसर आपली तक्र ार नोंदविली. व त्या महिला कर्मचाºयावर कार्यवाही करण्याची मागणी केली. दरम्यान सदर टोलनाक्यावर वारंवार लोकप्रतिनिधीचा अपमान केला जातो, याविषयी आवाज उठविणार असल्याचे आमदार चव्हाण यांनी सांगितले.

Web Title: Former MLA from Tolaanak

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.