‘त्या’ रस्त्याचे श्रेय माजी आमदारांनी लाटू नये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2018 01:43 AM2018-03-13T01:43:54+5:302018-03-13T01:43:54+5:30
निफाड विधानसभा मतदारसंघातील रस्त्यांसह विविध विकासकामांसाठी १०२ कोटी रुपयांपेक्षा अधिक निधीची अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली आहे. यात पिंपळगाव-चिंचखेड चौफुली ते पिंपळगाव बाजार समिती या साडेचार कि.मी. अंतराच्या रस्त्यासाठी १५ कोटी रु पये मंजूर झाले असून, त्याचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न माजी आमदार तथा बाजार समितीचे सभापती दिलीप बनकर करीत असल्याची टीका निफाड पंचायत समितीचे गटनेते राजेश पाटील यांनी केली आहे.
ओझर : निफाड विधानसभा मतदारसंघातील रस्त्यांसह विविध विकासकामांसाठी १०२ कोटी रुपयांपेक्षा अधिक निधीची अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली आहे. यात पिंपळगाव-चिंचखेड चौफुली ते पिंपळगाव बाजार समिती या साडेचार कि.मी. अंतराच्या रस्त्यासाठी १५ कोटी रु पये मंजूर झाले असून, त्याचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न माजी आमदार तथा बाजार समितीचे सभापती दिलीप बनकर करीत असल्याची टीका निफाड पंचायत समितीचे गटनेते राजेश पाटील यांनी केली आहे. ओझर येथे सोमवारी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत आमदार अनिल कदम यांनी सदर रस्त्यासाठी केलेल्या प्रयत्नांची कागदपत्रेच पुरावा म्हणून प्रसारमाध्यमांकडे सुपुर्द केली यावेळी पाटील म्हणाले की, निफाड तालुक्यातील शेतकºयांना शेतमाल विक्रीसाठी बाजार समितीत न्यावा लागत असल्याने रस्त्याची परिस्थिती अतिशय बिकट झाली आहे. सदर रस्ता कामासाठी आमदार कदम यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे विशेष निधीची मागणी केल्यामुळे अर्थसंकल्पात १५ कोटी रचपयांची तरतुद करण्यात आली. कदम यांनी पत्रकार परिषद घेऊन याबाबतची माहिती तालुक्यातील पत्रकारांना दिली होती. तरीही केवळ प्रसिद्धीच्या हव्यासापायी बनकर श्रेय लाटण्याचा प्रयत्न करीत असल्याचे पाटील यांनी सांगितले. बनकर यांचे जर भाजपाच्या मंत्र्यांशी एवढे स्नेहाचे संबंध असतील तर त्यांना तालुक्यात हल्लाबोल आंदोलन करण्याची गरज का पडली, असा सवाल करून माजी आमदारांनी आपले राजकीय वजन पालखेड गटासाठी वापरून तेथे विकास करावा,
असाही टोला पाटील यांनी यावेळी लगावला.